धर्मवीर सिनेमातला 'तो' सीन अन् राजन विचारेंचा मोठा खुलासा, म्हणाले, मीच दिघे साहेबांना सांगितलं...
जयदीप मेढे November 17, 2024 02:13 PM

Rajan Vichare on Dharmaveer Scene: मराठी मनोरंजनविश्वात धर्मवीर या चित्रपटानं चांगलंच नाव काढलं. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एका सीनवर शिवसेनेच्या राजन विचारे यांनी मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सीनमध्ये शिवसेनेचे नेते आनंद दिघे राजन विचारे यांना सभापतीपदाचा राजीनामा द्यायला सांगतात असं दाखवण्यात आलं आहे. यावर सिनेमाच्या पलिकडं जाऊन नक्की काय झालं होतं हे सांगितलं. 'मीच अनंद दिघे साहेबांना तसं करण्याची कल्पना सुचवल्याचं त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले राजन विचारे?

'त्यावेळी नगरसेवक असणारे एकनाथ शिंदे यांची दोन मुलं मतदानादरम्यान झालेल्या एका दूर्घटनेत गेली. तो प्रत्येकाच्या जीवनात गंभीर प्रसंग होता. जेंव्हा आपल्या डोळ्यासमोर असा प्रसंग घडतो तेंव्हा कोणताही कुटुंबप्रमुख पुढचं कामच करू शकत नाही. ते अशा परिस्थितीत असताना दिघे साहेंबांकडे मी स्वत:हून हा विषय काढला होता. शिंदेंना दु:खातून बाहेर काढण्यासाठी त्यांना कुठलं पद दिलं तर ते दु:ख विसरण्यासाठी आणि समाजसेवेसाठी मदत होईल. तेव्हा साहेबांनी विचारलं कसं करता येईल? त्यावर चार वर्षांपासून मी सभागृहता म्हणून काम केलंय. जर त्यांना पद दिलं तर  लोकांसाठी समाजसेवा ते करतील' असं राजन विचारे यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajan Vichare (@mp_rajanvichare)

ठाणे मतदारसंघातून उभारले आहेत राजन विचारे

सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे राज्यात वाहत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा ठाणे मतदारसंघ भाजपकडे गेल्यानंतर यंदा ठाणे मतदारसंघात आता तिहेरी लढत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधानंतर भाजपने सलग तिसऱ्यांदा संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आलीये. मनसेकडून अविनाश जाधव उभे आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत धर्मवीर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या सीनविषयी ते बोलत होते.

धर्मवीर २ची स्टारकास्ट काय?

धर्मवीर २ चित्रपटात प्रसाद ओक या अभिनेत्याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितिज दाते, तसेच स्नेहर तरडे, आनंद इंगळे, सुनिल तावडे यासारखी तगडी मराठमोळी स्टारकास्ट या सिनेमात दिसत आहे.  

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.