हिवाळा सुरु होताच सणांमुळे किंवा नाताळाची सुट्टी आपल्या मिळते. ही सुट्टी मिळताच आपण कुठेतरी बाहेर जायचं प्लॅनिग करतो.हिवाळ्यात प्रवास करण्याची मजा काही वेगळीच असते. आपल्या दैनंदिन दिनक्रमातून थोडी विश्रांती मिळते. या लहान सहलीमुळे आपलं माईंड देखील फ्रेश होऊन जाते. ५ दिवसांची सुटी कधी ७ दिवसांची होते कळत नाही. हिवाळ्यात फिरायला जाताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आज आपण हिवाळयात फिरायला जाताना कोणती काळजी घ्यावी याबदल जाणून घेऊयात.
हिवाळ्यात फिरायला जाताना आपल्याला प्रत्येक गोष्टींची दक्षता घ्यावी लागते. या दिवसात वातावरणात अनेक बदल घडत असतात. त्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. वातावरण थंडगार असल्यामुळे आजारी पडण्याचीही शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
– जाहिरात –
सर्वात प्रथम सहलीला जाताना कोणत्या ठिकाणी जाणार आहेत ते ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. हिवाळ्याच्या दिवसात काही ठिकाणी तापमान खूप जास्त असते तर काही ठिकाणी कमी त्यामुळे अशा ठिकाणी प्रवास करणे अवघड होऊन जाते. शक्यतो, कमी थंडी असलेलले डेस्टिनेशन निवडा, तापमान कमी असेल तर तुम्हाला सहलीचा आनंद देखील घेता येणार नाही.
फिरायला जाताना उबदार कपडे घ्यायला विसरू नका. जॅकेट, स्वेटशर्ट, स्वेटर इत्यादींचा समावेश करा.
– जाहिरात –
हिवाळ्यात वातावरणात अनेक बदल घडत असतात. फिरायला ज्या ठिकाणी जाणार त्या भागातील हवामानाची माहिती घ्या.
हिवाळ्यात वातावरणात खूप थंडावा असतो. या वातावरणामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आपण लगेच आजारी पडतो. त्यामुळे बॅगमध्ये इमर्जन्सी किट ठेवा.
वातावरण थंड असल्यामुळे आपण जास्त पाणी पित नाही . आपल्या शरीरातील पाण्याच प्रमाण कमी होते. अशा वातावरणामुळे आपण सहजपणे आजारी पडतो. त्यामुळे तुम्ही प्रमाणात पाण्याच सेवन करू शकता. शरीर जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा.
हिवाळ्यात बाहेर फिरताना थंड पदार्थांचे सेवन करू नका. प्रोटीन फायबर्स आणि व्हिटॅमिन्स असलेल्या पदार्थांचं तुम्ही समावेश करू शकता.
फिरायला जाताना तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊ शकता.
हेही वाचा : Winter travel tips – थंडीत प्रवास करताना घ्या ही काळजी
संपादन : प्राची मांजरेकर