'...म्हणून राज ठाकरेंशी युती नाही', उध्दव ठाकरेंनी सांगितलं भावासोबत युती स्थापन न करण्याचं कारण, नेमकं काय म्हणाले?
अंकिता खाणे November 17, 2024 02:43 PM

Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपुर्वी एक मोठं वक्तव्य केलं होतं. मी आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ नये, यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आतले आणि बाहेरचे अशा सगळ्यांचा समावेश आहे, असे वक्तव्य मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं होतं. अशातच आता निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरेंनी एबीपी माझाला मुलाखत दिली यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray) किंवा मनसेसोबत जाणार का या प्रश्नावर रोखठोक उत्तर दिलं आहे.

दोन्ही ठाकरे (Thackeray) बंधू एकत्र येणार का या  याकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. या प्रश्नाचे उत्तर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखती वेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. महाराष्ट्र द्रोह्यांसोबत जाणार नाही असा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी मनसेचा उल्लेख गुनसे असा केला आहे. 

नेमकं काय म्हणाले उध्दव ठाकरे?

दोन ठाकरेंनी एकत्र यावं असं महाराष्ट्रातील जनतेला वाटतं वैयक्तिक कौटुंबिक मुद्दे काही मुद्दे आहेत काही वेळेला इगो चा विषय आहे त्यामुळे ते होऊ शकत नाही का किंवा तुमचं स्वतंत्र नातं नसतं तर तुम्ही एकत्र आला असतात का? या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले असं नाही. मी जसा तुम्हाला मुख्यमंत्री पदाबद्दल सांगितलं महाराष्ट्राचे लुटारू नकोत बरोबर आहे, त्यांनी ते जाहीर केलेला आहे. कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, मग जर तो महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल आणि त्यांचा पाठिंबा त्याला असेल तर माझी त्यांच्याशी युती होऊ शकत नाही. एक तर मी माझं धोरण स्पष्ट केले आहे. तसं त्यांनी देखील त्यांचा धोरण स्पष्ट करावं. हे पाहिलं पक्षाचा नेमकं नाव काय आहे, मनसे आहे का गुण असे आहे ते त्यांनी ठरवावे असं एक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

निवडणुकीत राज ठाकरेंशी युती का झाली नाही?

मी माझ्या महाराष्ट्राशी बांधील आहे, माझ्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना ही महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, केली. ते महाराष्ट्राच्या लुटारूंना सत्तेवर बसवण्यासाठी केली नाही. एक तर जसं मी माझं धोरण स्पष्ट केलेला आहे, तसं त्यांनी देखील त्यांचं धोरण स्पष्ट करावं. 

जर तुमचं नातं नसतं तर जास्त सोपं झालं असतं का? यावर उद्धव ठाकरे म्हणाले, बोलायला खूप क्लेशकारक आहे. पण माझं नातं माझ्या महाराष्ट्राशी आहे आणि तो लुटला जातोय. ते मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, आणि त्या लुटारूंना मदत करणाऱ्यांना मदत करणं म्हणजे महाराष्ट्राशी विश्वासघात करण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची विश्वासघात करणाऱ्याशी मी युती करू शकत नाही आणि युती होऊ शकत नाही असं देखील पुढे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.