CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : मालेगावमध्ये कोणीतरी (उद्धव ठाकरें) येऊन गेले. ते दादा भुसेंना म्हणाले की तुमचा भुसा पाडतो. पण तुमचा गुसा एकनाथ शिंदेंने (CM Eknath Shinde) दोन वर्षांपूर्वीच पाडलाय, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली. दादाची दाढी पांढरी आहे, माझी काळी आहे. या दाढीची करामत तुम्ही बघितली आहे. या दाढीच्या नादी लागू नका असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिला. महाविकास आघाडी खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. ते मालेगाव विधानसभेचे महायुतीचे उमेदवार दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
मालेगावात भगव्याचे राज्य आहे. धनुष्यबाणाचंच राज्य राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दादा भुसे हा सेवेकरी आहे, त्याला पुन्हा निवडून द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले. दुसरा उमेदवार कोण आहे हिरे. मी अगोदर सांगितले हिऱ्याच्या पोटी गारगोटी असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केली. दादाच्या पांढऱ्या दाढी समोर यांची सगळ्यांची चेहरे काळे पांढरे पडले आहेत. हा बाळासाहेबांचा चेला आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांचे विचार सोडून मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी जनतेच्या मनातील सरकारशी बेईमानी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. - शिवसेना आणि धनुष्यबाण तुम्ही काँग्रेसच्या लावणीला बांधले. हा धनुष्यबाण वाचविण्याचे काम आम्ही केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे काम करताना तुमचा दादा माझ्या खांद्याला खांदा लावून उभा होता. बाळासाहेब म्हणाले होते माझी काँग्रेस होऊ देणार नाही. पण बाळासाहेबांच्या विचाराच्या विरुद्ध जाऊन सरकार बनवल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला चार वेळा दादा भुसे आमदार मिळाला आहे. महायुतीचे सरकार येणार सगळीकडे महायुतीचे वातावरण आहे. 160 पेक्षा जास्त जागा आपल्या महायुतीला मिळणार, पूर्ण बहुमत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ट्वेंटी फोर बाय सेव्हन मी सकाळी सातपर्यंत काम केलं आणि आठला टेकऑफ केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मी पूर्ण राज्य पालथे घातले आहे. दादा भुसेंनी मागणी केली मालेगाव जिल्हा झाला पाहिजे. मागेही केली होती. मालेगाव जिल्हा दिला तर दादाचा लीड डबल करणार का? तुम्ही डबल लीड देणार मग मी मालेगाव जिल्हा देणार असे मुख्यमंत्री म्हणाले. शेती उद्योग मालेगावला द्यावे ही मागणी आहे.
कृषीचे पाच कॉलेज झाले आता मेडिकल आणि इंजीनियरिंग कॉलेज देणार असल्याचे दादा भुसे म्हणाले.