बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024 आधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार पर्थ येथे 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार या नात्याने जसप्रीत बुमराह भारताचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या या 5 सामन्यांच्या मालिकेत 4-1 ने विजय मिळवणं बंधनकारक आहे. त्यामुळे बुमराहची कर्णधार म्हणून पर्थमध्ये ‘कसोटी’ लागणार आहे.
रोहित पहिल्या कसोटीत खेळणार की नाही? याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून साशंकता होती. रोहित आणि रितीका दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याने हिटमॅन पहिल्या कसोटीत उपलब्ध नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र 15 नोव्हेंबरला रोहित आणि रितीकाला पुतरत्नाचा लाभ झाला. त्यामुळे रोहित आता पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, असं मानलं जात होतं. मात्र रोहित कुटुंबियांसह आणखी वेळ घालवणार आहे. रोहितने आपण पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचं बीसीसीआयला कळवल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता टीम इंडिया रोहितशिवाय खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.
दरम्यान आता रोहितच्या जागी कुणाला संधी मिळणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. आम्ही रोहितच्या जागेसाठी केएल राहुल आणि अभिमन्यू ईश्वरन या दोघांकडे पर्याय म्हणून पाहत असल्याचं गौतम गंभीर याने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. आता टीम मॅनेजमेंट या दोघांपैकी कुणाची निवड करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
रोहित शर्मा आऊट
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.