मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस काही महिन्यांपूर्वीच परदेशातून परत आली. परत आल्यावर तिने प्रेक्षकांना दोन गुड न्यूज दिल्या. पहिली म्हणजे मृणाल पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात परतली आणि ती आता लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसतेय. तर दुसरी गुड न्यूज म्हणजे मृणालने तिच्या नवऱ्याच्या साथीने नवीन हॉटेल सुरू केलं आहे. अभिनेत्रीने तिचा पती नीरज मोरे याच्या साथीने ठाण्यात नवीन हॉटेल सुरू केलंय. आता मृणाल बिझनेसवूमन झालीये. पाहुयात तिचं हॉटेल आतून कसं आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत नवीन काहीतरी सुरु करणार असल्याच सांगितलं होतं. तेव्हापासून अभिनेत्री कोणता नवा व्यवसाय सुरु करते याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. “लवकरच काहीतरी नवीन घेऊन येत आहोत. तुम्ही ओळखू शकता का नेमकं काय सुरु आहे?”, असं कॅप्शन देत तिने एका जागेचं इंटिरियर डिझायनिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. आता तिने स्वतःचं हॉटेल सुरू केलंय. तिच्या हॉटेलचं नाव आहे बेली लाफ्स. हे हॉटेल तिने आणि तिच्या पतीने मिळून डिझाइन केलंय. या हॉटेलला तिने आणि तिच्या पतीने मिळून डिझाइन केलंय. तिने हॉटेलसाठी विंटेज लूक निवडलाय. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे हे हॉटेल आहे.
mrunal dusanisहॉटेलमध्ये त्यांनी खूप हटके स्टाइलच्या फ्रेम लावलेल्या दिसतायत. तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लाइट्स वापरल्या आहेत. रश्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून घेतलाय. अगदी शांत आणि नीटनेटकं वातावरण या हॉटेलमध्ये आहेत. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिला या हॉटेलसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मृणालने आपल्या हॉटेलच्य ओपनिंगला अनेक मित्रमंडळींना आमंत्रण दिलं होतं.