Travel Job: तुम्हाला प्रवास करायला प्रचंड आवडतो? तर मग या 10 नोकऱ्या तुमच्यासाठी आहे परफेक्ट
Jobs that Required Travel: तुम्हाला जर प्रवास करायला खूप आवडत असेल, तर अशा काही नोकऱ्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळेल. सोबत तुम्ही तुमचे करिअर देखील घडवू शकता.
अनेकांना प्रवास करायला आवडते. पण फक्त प्रवास करून पोट भरत नाही. प्रवासामध्ये होणारा खर्च भागवण्यासाठी पैसे तर कमवावेच लागतात. यासाठी प्रत्येकजण वर्षभर काम करतात, आणि आपल्या आवडत्या ठिकाणी जाण्यासाठी पैसे साठवतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही जॉबचे पर्याय घेऊन आलो आहोत, जे करताना तुम्हाला प्रवास करण्याची संधी देखील मिळेल.
प्रवासाचा छंद झोपासणाऱ्या नोकऱ्या
तुम्हाला जर प्रवास करायला आवडत असेल तर अशा काही नोकऱ्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा प्रवासाचा छंद झोपासू शकतात.
टूर गाईड
टूर गाईड आपल्याला कोणत्याही ठिकाणाच्या वैशिष्ट्याबद्दल आणि इतिहासाबद्दल ही सर्व माहिती देतो. तुम्हाला प्रवास करायला आवडत असेल तर तुम्ही टूर गाइड बनू शकता. आज अनेक ट्रॅव्हल एजन्सी टूर गाईडसाठी नोकऱ्या देतात. ट्रॅव्हल एजन्सी प्रवाशांसोबत त्यांचे मार्गदर्शक पाठवतात. विशेष बाब म्हणजे ट्रॅव्हल गाईड बनल्यानंतर तुमचा जेवण आणि निवासाचा खर्चही ट्रॅव्हल एजन्सी देते.
इव्हेंट कोऑर्डिनेटर
सध्याच्या काळात इव्हेंट कोऑर्डिनेटरसारख्या पदांची मागणी वाढत आहे. तुम्हीही इव्हेंट कोऑर्डिनेटर झालात तर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांच्या तयारीसाठी जावे लागेल. या पदावर काम केल्याने तुम्हाला भरपूर प्रवास करण्याची संधी मिळते.
वाहन चालक
बरेच लोक स्वत: वाहन चालवून प्रवास करणे टाळतात आणि ड्रायव्हरसोबत जाणे पसंत करतात. ड्रायव्हर बनल्याने तुम्हाला वेगवेगळ्या लोकांसह विविध ठिकाणे एक्सप्लोअर करण्याची संधी मिळेल. आणि यासाठी शिक्षणाची विशेष अट नाही, पण तुम्हाला वाहन चालवणे आणि ट्राफिकचे नियम माहीत असणे गरजेचे आहे.
फ्लाइट अटेंडंट
फ्लाईट अटेंड बनून तुम्ही जगभर प्रवास करू शकता. विविध खाजगी विमान कंपन्या आहेत जिथे तुम्हाला फ्लाईट अटेंडेन्स पदावर रुजू होता येईल. मात्र त्यासाठी तुम्हाला याचे पूर्व प्रशिक्षण आणि काही आंतरराष्ट्रीय भाषाज्ञान असणे गरजेचे आहे.
फ्रिलान्स फोटोग्राफर
नवीन ठिकाणी फोटोग्राफीचा आनंद लुटू शकता. तसेच तुमचे फोटो तुम्ही विविध प्रसारमाध्यमांना विकू शकतात, त्याचप्रमाणे तुम्ही प्रदर्शन देखील भरवू शकतात.
ट्रॅव्हल ब्लॉगर
तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगर बनून तुमचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करून पैसे बक्कळ कमवू शकता. आज भारतासह जगभरातील विविध देशांतील लोक ट्रॅव्हल व्लॉगिंगद्वारे आपले घर चालवत आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या प्रत्येक सहलीचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो लोकांशी ऑनलाइन शेअर करायचा आहे. तुमचा व्हिडिओ किती व्ह्यूज होतो त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतील.
परराष्ट्र सेवा अधिकारी
तुम्ही फॉरेन टर्मिनल ऑफिसर बनूनदेखील तुमचे करियर घडवू शकतात.
जहाज चालक दल सदस्य
सागरी जहाजावर तुम्ही समुद्र प्रवासाचा अनुभव घेऊ शकता.
एनजीओ कार्यकर्ता
जर तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर तुम्ही त्याचे प्रशिक्षण घेऊन, वेगवेगळ्या स्तरावरील एनजीओसाठी काम करू शकतात. ज्या अंतर्गत तुम्हाला विविध देशांना भेट देता येऊ शकते.
पत्रकार
पत्रकारही वृत्तांकन घडामोडीसाठी भटकंती करत असतात. तुम्ही रिपोर्टिंग तसेच मुक्त पत्रकारिता करून तुमचा प्रवासाचा छंद झोपासू शकतात.