बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून काल (रविवारी) गेटवरच रोखण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं होतं. जवळपास अर्ध्या तास थांबल्यानंतर त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं. या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आहेत. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांच्या ऑफिसकडून देण्यात आली होती. त्याचबरोबर या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काल मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो त्यावेळी बारामतीतील टेक्सटाईल पार्क मध्ये जे घडलं मला पण वेदना झाल्या. तू मला सगळ्यांना माहिती आहे कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखा असेल तर मी करतो तर काकींचा तर प्रश्नच नाही त्या माझ्या आईसारख्या आहेत आणि मी खोलात गेलो मला नंतर कळलं तिथे नेमकं काय घडलं ते. घरात माझ्या कुणी माझ्या विरोधात उभा राहिलं तरी त्यांना देखील लोकशाही तो अधिकार आहे मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका त्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका त्यासंदर्भात बारामतीची जनता सुज्ञ आहे मी इतकं काम केलं मी इतकं सगळं सांगितलं तरी देखील तरीदेखील बारामतीकरांनी मला लोकसभेला झटका दिला.
शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे या बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये जात होत्या. त्यावेळी त्यांची गाडी गेटवरती आल्यानंतर अडवण्यात आली. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवलं होतं. त्यांची गाडी आतमध्ये सोडली नाही. या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये प्रतिभा पवार सुरक्षा रक्षकाला प्रश्न विचारत होत्या, तुम्ही आम्हाला पाहून गेट बंद केलं का? तुम्हाला गेट बंद करण्यासाठी कोणी सांगितलं. आम्हाला पाहून तुम्ही गेट बंद केलं आहे का? तुम्हाला कोणाचा फोन आला? आतमधील दुकाने बंद आहेत का? आमची गाडी आल्यावर गेट बंद केलं का? आम्ही चोरी करण्यासाठी आलेलो नाही, आम्हाला शॉपिंग करायची आहे. आम्हाला त्या बॅगच्या शॉपमध्ये जायचं आहे. आम्हाला शॉपिंग करायची आहे असं त्या व्हिडिओमध्ये बोलल्याचं दिसत आहे.