गॅस शेअर्सचा झाला धूरsss! या कारणांमुळे बाजारात एकाच दिवसात तब्बल 19 टक्क्यांची झाली घसरण
ET Marathi November 18, 2024 10:45 PM
मुंबई : एमजीएल लिमिटेड सारख्या शहरी गॅस कंपन्यांचे शेअर्स आज 14 टक्के आणि आयजीएल लिमिटेड 19 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. आयजीएलचा शेअर मागील 405 रुपयांच्या बंद भावाच्या तुलनेत 328 रुपयांवर व्यवहार करत होता. तर एमजीएलचा शेअर जो गेल्या ट्रेडिंग सत्रात 1312 रुपयांच्या आसपास बंद झाला होता, तो 14 टक्क्यांच्या घसरणीसह 1132 रुपयांच्या आसपास होता.देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण होत असताना गॅस क्षेत्रातील शेअर्समध्येही मोठे नुकसान झाले. गेल्या आठवड्यात सरकारकडून एक बातमी आल्यानंतर आज बाजार उघडताच या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू झाली गॅस शेअर्स का कोसळले? सरकारने सलग दुसऱ्या महिन्यात एपीएम गॅस वाटपात कपात केली आहे. GAIL ने 13-20% कपात केली आहे, जी 6 नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. यापूर्वी 16 ऑक्टोबर रोजी ओएनजीसीने प्रशासित किंमत यंत्रणा (APM) गॅस वाटप 20 टक्क्यांनी कमी केले होते. आयजीएलच्या APM मध्ये 20%, MGL मध्ये 18% आणि Adani Total Gas मध्ये 13% कपात झाली आहे. कमी गॅस वाटपामुळे कंपन्यांच्या मार्जिनवर आणि नफ्यावर परिणाम होऊ शकतो. या बातमीनंतर ब्रोकरेजकडून शेअर्सला डाऊनग्रेड रेटिंग अपडेट करण्यात आले. त्यामुळे या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. ब्रोकरेजचे मत काय?देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल सांगतात की, कंपन्यांना नवीन क्षेत्रांतून गॅस वाटप करता येईल. नवीन फील्डमधून गॅसची किंमत $9-10/mmbtu (मेट्रिक मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट) असली पाहिजे, तर APM ची किंमत $6.5/mmbtu आहे. जेपी मॉर्गन म्हणाले की, कंपन्यांना जास्त किमतीत पर्यायी गॅस शोधावा लागेल. गॅसच्या उच्च किंमतीमुळे मार्जिनवर परिणाम होईल. ब्रोकरेजने आर्थिक वर्ष 2025 - 2026 साठी आयजीएलचा निव्वळ नफ्याचा (PAT) अंदाज 11% आणि MGL चा अंदाज 25% ने कमी केला आहे. CITI म्हणते की वाटपातील कपातीमुळे किंमती >7/kg ने वाढण्याची अपेक्षा आहे. गॅस शेअर्समध्ये गुंतवणुकीची रणनिती काय?ही बातमी आल्यानंतर ब्रोकरेज हाऊसेसनी गॅस शेअर्सचे रेटिंग कमी केले असून जेफरीजने एमजीएलचे रेटिंग BUY वरून अंडरपरफॉर्मवर अपडेट केले आहे आणि लक्ष्य किंमत 1740 वरून 1130 पर्यंत कमी केली आहे. IGL वरील ब्रोकरेजचे मत होल्ड वरून अंडरपरफॉर्मवर अपडेट केले आहे, तर 390 रुपयांचे लक्ष्य 295 पर्यंत कमी केले आहे. जेपी मॉर्गनने एमजीएलचे ओव्हरवेट वरून न्यूट्रल केले आहे. लक्ष्य किंमत 2,000 रुपयांवरून थेट 1,300 रुपये कमी केली आहे. तसेच, आयजीएल अंडरवेटवरून न्यूट्रलमध्ये खाली आणले गेले आहे आणि लक्ष्य किंमत 520 वरून 343 पर्यंत वाढवली आहे.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.