आजवर जे जे स्वप्न दाखविले ते पूर्ण दाखवले, नागनदीतही बोट चालवून दाखवणार; नितीन गडकरींचा सांगता सभेतून नागपूरकरांना शब्द  
रजत वशिष्ठ, एबीपी माझा November 18, 2024 09:13 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :  मी आज वर जे जे स्वप्न दाखविले, ते सर्व पूर्ण करून दाखविले आहे. माझं एक निश्चित आहे, जे जे मी बोलतो ते ते शंभर टक्के करून दाखवितो. मी नागपुरातील नाग नदीमध्ये बोट चलवण्याबाबत बोललो होतो, ती बोट मी चालल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास दर्शवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपल्या सांगता सभेतून नागपुरकरांना (Nagpur) शब्द दिला आहे.

नागपूर विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार प्रवीण दटके यांच्या प्रचारासाठी मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील मंगळवारी भागात सभा होत आहे. या निवडणुकीतील गडकरी यांची ही अखेरची सभा आहे. विशेष म्हणजे याच मध्य नागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय आहे. काल याच मतदारसंघा अंतर्गत बडकस चौकावर प्रियंका गांधी यांच्या रोड शो दरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. आज त्याच ठिकाणी सौ बीमारी का एक ही इलाज है. कमल के फुल का बटन दबाओ, तुमच्या सर्व समस्या सुटतील. असे आवाहन गडकरी यांनी केलं आहे. 

सिमेंट रस्त्यांमुळे लोकांच्या घरी पाणी गेले, त्यांना माझा एक सवाल

पुढील काही महिन्यात आपण संपूर्ण नागपूर शहर टँकर मुक्त करू. नवीन पाण्याच्या टाक्यांमुळे पाण्याचा दाब वाढवू शकणार आहे. पाण्याची जुनी पाइपलाईन ही आपण बदलणार आहोत. तर नागपूरच्या सर्व नदी आणि नाल्याच्या शुद्धीकरणाचे काम आपण पुढील तीन ते चार महिन्यात करायचे आहे. मागील वर्षी नागपुरात पूर येऊन काही भागात लोकांच्या घरी पाणी गेले. लोकांनी आरोप केले की सिमेंट रस्त्यांमुळे लोकांच्या घरी पाणी गेले. मला आरोप करणाऱ्यांनी उत्तर द्यावे, मग या वर्षी पावसात लोकांच्या घरी पाणी का गेले नाही? या वर्षी आपण अतिक्रमण काढले आणि पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. माझा आरोप करणाऱ्यांना म्हणणं आहे. माहिती घेतल्या शिवाय आरोप करत जाऊ नका.

नागपूर शहराला देशाचा नंबर वन शहर बनवून दाखवू- नितीन गडकरी 

ही निवडणूक प्रवीण दटके च्या भवितव्याची निवडणूक नाही. ही निवडणूक तुमच्या भवितव्याची आहे. सर्व सत्ता 60 वर्ष काँग्रेस कडे होती. त्यांनी 60 वर्षात नागपूरचा काय विकास केला. आणि आम्ही (गडकरी-फडणवीस ) दहा वर्षात किती कामे केली, हे तुम्हीच ठरवा. हे काम होऊ शकले, कारण तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिले. असेच पाठीशी राहिले, तर आम्ही नागपूर शहराला देशाचा नंबर वन शहर बनवून दाखवू. मी ज्या प्रभागात राहतो तिथचे नगरसेवक प्रवीण दटके, मध्य नागपूरचे उमेदवार आहेत. अनेक कठीण कामे त्यांनी आमच्या भागात करून दिले. प्रवीण दटके यांच्या चांगल्या कामांची मोठी यादी मी सांगू शकतो. महापौर आणि भाजप शहर अध्यक्ष म्हणून ही त्यांनी आपला कर्तत्व सिद्ध केले आहे. प्रवीण दटके आमदार झाल्यानंतर महाराष्ट्रातील पहिल्या पाच क्रियाशील कार्यक्षम आमदार म्हणून राहणार आहे. असेही गडकरी म्हणाले.  

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.