बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024 स्पर्धेतील कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरुवात होत आहे. टीम इंडिया मालिकेतील पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थित खेळणार आहे. रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका सजदेह या दोघांना 15 नोव्हेंबरला पुत्ररत्नाचा लाभ झाला. मात्र त्यानंतरही रोहितने आणखी काही दिवस कुटुंबियांसह राहणार असून पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध राहणार नसल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. रोहितच्या पहिल्या सामन्यात न खेळण्याच्या निर्णयावरुन ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर ट्रेव्हिस हेडने प्रतिक्रिया दिली आहे. ट्रेव्हिस हेडने मी रोहितच्या जागी असतो कर काय केलं असतं? हे हेडने सांगितलंय.
मी जर रोहितच्या जागी असतो तर मी सुद्धा तसंच केलं असतं. “मी रोहितच्या निर्णायां समर्थन करतो. मी अशाच परिस्थितीत असतो तर मी तसाच निर्णय घेतला असता. एक क्रिकेटर म्हणून आम्हाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. आम्ही लॅव्हिश लाईफ जगतो. मात्र दुसरी बाजू पाहिली तर आम्हाला अनेक अविस्मरणीय क्षणी कुटुंबियांसह राहता येत नाही. आम्हाला त्या अविस्मरणीय घटनांचा साक्षीदार होता येत नाही. मी पण रोहितसारखाच निर्णय घेतला असता कारण अशी वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. आशा आहे की रोहित लवकरच सीरिजसाठी परतेल”, असं म्हणत हेडने रोहितच्या निर्णयाचं समर्थन केलं.
रोहितच्या पहिल्या आणि मोठ्या मुलीचं नाव समायरा आहे. समायराचा जन्म डिसेंबर 2018 मध्ये झाला होता. त्यानंतर आता जवळपास 4 वर्षांनी समायरा 15 नोव्हेंबरला मोठी बहिण झाली आहे. तसेच ट्रेव्हिस हेड यालाही 2 अपत्य आहेत.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.