बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नेहमीच पहाटेच्या सुमारास कामाला लागतात. पण त्यांची ही सवय अनेकांना अधिकाऱ्यांसापासून, नेत्यांपर्यंत सर्वांनाच गोत्यात आणते. पण अजित पवारांना (Ajit Pawar) ही सवय कशी लागली ते त्यांनी आज बारामतीत झालेल्या सांगता सभेवेळी बोलताना सांगितलं आहे.
आदरणीय शरद पवार यांनी मला 1990 ते 1991 ला बारामती मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली मला तेव्हा एक भीती होती. कारण पवार साहेबांसारखा नेता बारामतीकरांचा 1967, 1972, 1978, 1980, 1985 आणि 1990 इतके वर्ष ते बारामतीचा प्रतिनिधित्व करत आहेत. नंतर आपण तिथे जायचं आणि नंतर जर आपण कमी पडलो. तर बारामतीकर बिन पाण्यानेच माझी करतील बाकी काही ठेवणार नाहीत. कारण म्हणतील ही तर नुसताच झोपतोय तेव्हापासूनच झोप गेली आणि त्याच्यापासूनच पहाटे उठायची सवय लागली आणि रात्री उशिरापर्यंत काम करायची सवय लागली. तेव्हापासून बारामतीकरांनो 1991पासून आजपर्यंत विकासाच्या बाबतीमध्ये मागे वळून बघितलं नाही सतत विकास विकास विकास केला अजित पवार म्हणालेत.
काल मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो त्यावेळी बारामतीतील टेक्सटाईल पार्क मध्ये जे घडलं मला पण वेदना झाल्या. तू मला सगळ्यांना माहिती आहे कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखा असेल तर मी करतो तर काकींचा तर प्रश्नच नाही त्या माझ्या आईसारख्या आहेत आणि मी खोलात गेलो मला नंतर कळलं तिथे नेमकं काय घडलं ते. घरात माझ्या कुणी माझ्या विरोधात उभा राहिलं तरी त्यांना देखील लोकशाही तो अधिकार आहे मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका त्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका त्यासंदर्भात बारामतीची जनता सुज्ञ आहे मी इतकं काम केलं मी इतकं सगळं सांगितलं तरी देखील तरीदेखील बारामतीकरांनी मला लोकसभेला झटका दिला.
बारामतीमध्ये सांगता सभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मला फक्त आत्तापर्यंत सात आणि एक खासदार म्हणजे आठ निवडणुकीमध्ये एकाच सभेमध्ये थोडंसं मी टेन्शनमध्ये होतो. ते म्हणजे 1999 मध्ये आपले गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे यांचा सरकार होतं. आपण विरोधी पक्षांमध्ये होतो त्यावेळेस सर्व पक्ष उमेदवार म्हणून आदरणीय चंद्रराव तावरे यांना उभे राहिले होते. ज्यांचे सर्वत्र संपर्क चांगले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी उत्तम चालू केला होता. त्यामुळे एकास एक अशी उत्तम लढत होणार होती आणि ती झाली त्यावेळेस मी थोडासा दबकत दबकत काय होतंय काय नाही. परंतु, बारामतीकरांनी त्यावेळेस ही मला पन्नास हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं, असं अजित पवार म्हणालेत.