Latest Maharashtra News Updates : आचारसंहिता काळात तपासणीमध्ये सापडले २९ कोटी ४० लाख रुपये
esakal November 19, 2024 12:45 AM
Chhatrapati Sambhaji Nagar Live: आचारसंहिता काळात तपासणीमध्ये सापडले २९ कोटी ४० लाख रुपये

आचारसंहिता काळात तपासणीमध्ये २९ कोटी ४० लाख रुपये सापडले आहे. साडेतीन लाख वाहनांची तपासणी करून २९ कोटी रुपये आतापर्यंत जप्त करण्यात आलेत, अशी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माहिती दिली.

Mumbai Live: दक्षिण मुंबईतील मतदारांशी आमचे कौटुंबिक नाते - मिलिंद देवरा

वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी रोड शो दरम्यान म्हटले की "दक्षिण मुंबईतील मतदारांशी आमचे कौटुंबिक नाते असून माझे वडील गेली अनेक वर्षे येथे खासदार होते. इथल्या जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही संघर्ष करत राहू. मला विरोधी पक्षांच्या नेत्यांना सांगायचंय की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा द्वेष करत असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुंबई, महाराष्ट्र आणि भारताचा तिरस्कार करा, जर तुम्ही आमच्या मुख्यमंत्री, पंतप्रधानांच्या धोरणांच्या विरोधात असाल तर याचा अर्थ तुम्ही भारतातील लोकांच्या विरोधात आहात, असे म्हणू नये."

Baramati Live: बारामतीत युगेंद्र पवारांच्या प्रचाराची सांगता सभा

बारामतीत नवीन तत्रंज्ञान आणणार - युगेंद्र पवार

बारामतीत नवीन फळी निर्माण करू

Maharashtra Live: भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरीकानं मतदानाचा आपला हक्क बजवावा - ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचं आवाहन.

मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे. भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरीकानं मतदानाचा आपला हक्क बजवावा - ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचं आवाहन.

कर्णिक यांनी करुळ इथल्या निवासस्थानी गृहमतदानाचा हक्क बजावला.

Maharashtra Live: विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

जीएसटी भरणाऱ्या करदात्यांना केंद्र सरकारचा दिलासा

जीएसटी रिटर्न भरण्यासाठी जीएसटी अंमलबजावणी समितीकडून मुदतवाढ

महाराष्ट्र व झारखंड मधील मतदानामुळे २० ऐवजी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

फक्त महाराष्ट्र व झारखंड मधील करदात्यांना मिळणार सूट

ऑक्टोबर महिन्यातील जीएसटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ

Maharashtra Assembly Elections 2024 Live Updates: पुण्याच्या कॅन्टोन्मेंट मतदार संघात रेवंत रेड्डीचं तेलगू भाषेत भाषण; मोदींवर केली टीका

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा घेतली. यावेळी रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या भाषेत भाषणाला सुरुवात केली. रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ रेवंत रेड्डी यांचा कॅन्टोन्मेंट मतदार संघात झांजावती दौरा होता. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

महाविकास आघाडीचे सरकार आले की मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईल. असा शब्द त्यांनी कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील रहिवाशांना दिला. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे हाल केले आहेत. पुणे कँटोन्मेंट मधून महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केले.

Rashmi Shukla Live: रश्मी शुक्लांच्या याचिकेवर सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

रश्मी शुक्ला यांच्या संदर्भातील याचिकेवर सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

महासंचालक रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेतलं जाऊ नये म्हणून न्यायालयात याचिका कशी काय होऊ शकते?, हायकोर्टाचा सवाल

Nagpur Live: अभिनेता मिथुन चक्रवर्थी भाजपच्या प्रचार रॅलीत

नागपुरमधील भाजपच्या प्रचार रॅलीत बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्थी सहभागी झाला आहे. अभिनेता म्हणाला, " नागपुर हे एक सुंदर शहर आहे. जिकडे खूप सकारात्मक वातावारण आहे. माहाराष्ट्रातील प्रत्येक शहर नागपुरसारखे बनवायला हवे. मी निवडणुक निकालाबद्दल काही बोलणार नाही, ते आता लोकच ठरवतील."

Pune Live : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

पुण्यातील हडपसर मधील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला .

Nashik Live: नाशिकमध्ये उमेदवारांच शक्तिप्रदर्शन

- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यासाठी उरले अवघे काही तास

- प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बाईक रॅली, प्रचार रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांच शक्तिप्रदर्शन

- जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड

Ajit Pawar Live : बारामतीत आज अजित पवारांची सभा

- बारामती मध्ये अजित पवार यांच्या सांगता सभेच्या सभेची तयारी

- ⁠सांगता सभेसाठी मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवर टाकण्यात आलेला आहे मंडप

- ⁠अजित पवार यांच्या स्टेजवर कुटुंबातील कोणते सदस्य उपस्थित राहणार याची उत्सुकता

Supriya Sule LiveUpdate: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी. सुप्रिया सुळे यांच्या हेलिकॉप्टर आणि गाड्या देखील तपासल्या. पुण्यातील भोर मतदार संघाच्या सभेला जाताना सुप्रिया सुळे यांच्या गाड्यांची तपासणी केली.

Kailash Gahlot Liveupdate: कैलाश गहलोत दिल्लीतील भाजप कार्यालयात पोहोचले

कैलाश गहलोत यांनी आप आणि दिल्लीच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एक दिवसानंतर दिल्लीतील भाजप कार्यालयात पोहोचले.

Nashik LiveUpdate: नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेल कोट्यावधींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची कारवाई केली आहे.

Nashik Winter Update : थंडीत घट..! नाशिकचे किमान तापमान पोहोचले 17.7 अंशांवर

राज्यात अनेक ठिकाणी थंडी वाढली असली तरी काही नाशिकमध्ये पारा वाढला असून किमान तापमान 17.7. अंशांवर पोहचले आहे. तर पुण्यातील लोणी काळभोरमध्ये किमान तापमान 12. 5 वर पोहचले आहे.

Assembly Election: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात झाली आहे. नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर येथून रिंगणात तर सना मलिक अणुशक्तीनगर येथून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

Assembly Election: मागठाणे मतदारसंघात उदेश पाटेकर नावावरून संभ्रम

मागठाणे मतदारसंघात उदेश पाटेकर नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणात ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Bhushan Gagrani press conference: आज दुपारी ४ वाजता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांची पत्रकार परिषद

आज दुपारी ४ वाजता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Assembly Election: मुंबईतील बीकेसीतल्या सभेकडे मतदारांनी फिरवली पाठ

मुंबईतील बीकेसीतल्या सभेकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.

Assembly Election: शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे आज एक टिझर जारी

शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे आज एक टिझर जारी करण्यात आला आहे. यात महायुतीये या शब्दावरून वाद होण्याची शक्यता आहे.

Manipur Violence LIVE : मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार, पाच जिल्ह्यांमध्ये तणावपूर्ण शांतता

इंफाळ : मणिपूरमधील जिरिबममधील मैतेई समुदायातील तीन महिला आणि तीन बालके यांचे मृतदेह सापडल्याने शनिवारी संध्याकाळपासून मणिपूर येथे नव्याने हिंसाचार उसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये मोठ्याप्रमाणात हिंसाचाराची घटना घडलेल्या पाच जिल्ह्यामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Shivalingeshwara Swamy Passed Away : श्री अल्लमप्रभू अनुभव पीठ विरक्तमठाच्या शिवलिंगेश्वर स्वामीजी यांचे निधन

बंगळूर : शिकारीपूर तालुक्यातील बळ्ळीगावी येथील श्री अल्लमप्रभू अनुभव पीठ विरक्तमठाचे आचार्य असलेले शिवलिंगेश्वर स्वामीजी यांचे आज सकाळी हुबळी शहरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. स्वामीजींना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तत्काळ तत्त्वदर्शन रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात असताना त्यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले, मंतूर मठात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे भाविकांनी सांगितले. शिवलिंगेश्वर स्वामीजींच्या निधनाने त्यांचे असंख्य भक्त शोकसागरात बुडाले आहेत. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली वाहिली आहे.

PM Modi LIVE : ब्राझीलच्या नागरिकांकडून पंतप्रधान मोदींचे संस्कृत मंत्रोच्चारात स्वागत

ब्राझीलमधील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रिओ दि जानेरो येथे संस्कृत मंत्रोच्चारात स्वागत केले.

Ganapatipule News : गणपतीपुळे किनाऱ्यावर शिल्पातून मतदान जागृती

संगमेश्वर : देवरूख येथे संगमेश्वर तालुक्यात नव्याने जिल्हा परिषद शाळेत नियुक्त झालेल्या सुमारे २०० प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण झाले. हे प्रशिक्षणानंतर दोन मित्र गणपतीपुळे येथे फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांनी २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर मतदान करा, असे वाळूशिल्प काढून जागृती केली.

Amit Shah Sabha LIVE : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सर्व सभा रद्द

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रविवारी होणाऱ्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या. अमित शहा यांच्या विदर्भात चार सभा होणार होत्या. या सभा रद्द करून शाह तातडीने नागपूरवरून दिल्लीकडे रवाना झाले. सभा रद्द होण्यामागे प्रशासकीय कारण असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार वाढल्यानेच शहा दिल्लीला परतल्याचे सूत्रांनी सांगितले. अमित शहा यांच्याऐवजी माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांच्या सर्वच सभा घेतल्या.

Kolhapur News LIVE : 'जनसुराज्य'चे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

करवीरचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रचार सभा करून येताना मानवाडजवळ 6 ते 7 जणांनी त्यांच्यांवर हल्ला केला. संताजी घोरपडे यांची गाडी अडवून काठी आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. घोरपडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Maharashtra Assembly Elections LIVE : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Latest Marathi Live Updates 18 November 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभर जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात धडाडणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा आज थंडावणार आहेत. या निमित्ताने उठलेला प्रचाराचा धुरळाही खाली बसणार आहे. या निवडणुकीतील जाहीर प्रचाराची सांगता आज सायंकाळी सहाला होणार असून, मतदान २० नोव्हेंबरला आहे. तसेच करवीरचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. दिल्लीचे परिवहन मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) वरिष्ठ नेते कैलाश गहलोत यांनी ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मणिपूरमधील जिरिबमयेथील मैतेई समुदायातील तीन महिला आणि तीन बालके यांचे मृतदेह सापडल्याने शनिवारी संध्याकाळपासून येथे नव्याने हिंसाचार उसळला. जिल्ह्यामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागात आज ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.