मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
अभिषेक मुठाळ November 20, 2024 08:43 PM

मुंबई : राज्यातील 288 मतदारसंघात आज सकाळी 7 वाजलेपासून मतदान सुरू झालं असून दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढताना दिसून येत आहे. त्यानुसार, राज्यातील 288 मतदारसंघाच्या 36 जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झालं असून मतदारांचा उत्साह शेवटच्या टप्प्यात अधिक दिसून आला. त्यामध्ये, सर्वाधिक मतदान हे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात झालं असून सर्वात कमी मतदान ठाणे जिल्ह्यात  झालं आहे. गडचिरोलीत 69.63 आणि ठाणे जिल्ह्यात 49.76 टक्के मतदान झालं आहे. 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झालं आहे. त्यामध्ये, सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात झालं असून गडचिरोलीत 69.63 टक्के मतदान झालं आहे. त्यानंतर, भंडारा जिल्ह्यात 65.88 टक्के मतदान झालं असून गोंदिया जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात 65.09 टक्के मतदान झालं आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक कमी मतदानाचा विचार केल्यास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 49.76 टक्के एवढे कमी मतदान झालं आहे. 

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर -  ६१.९५टक्के,
अकोला - ५६.१६ टक्के,
अमरावती -५८.४८  टक्के, 
औरंगाबाद- ६०.८३ टक्के, 
बीड - ६०.६२ टक्के, 
भंडारा- ६५.८८ टक्के, 
बुलढाणा-६२.८४  टक्के, 
चंद्रपूर- ६४.४८ टक्के,
धुळे - ५९.७५ टक्के, 
गडचिरोली-६९.६३ टक्के, 
गोंदिया -६५.०९  टक्के, 
हिंगोली - ६१.१८ टक्के, 
जळगाव - ५४.६९ टक्के, 
जालना- ६४.१७ टक्के, 
कोल्हापूर-  ६७.९७ टक्के,
लातूर _ ६१.४३ टक्के, 
मुंबई शहर- ४९.०७ टक्के, 
मुंबई उपनगर-५१.७६  टक्के,
नागपूर - ५६.०६ टक्के,
नांदेड -  ५५.८८ टक्के, 
नंदुरबार- ६३.७२  टक्के,
नाशिक -५९.८५  टक्के, 
उस्मानाबाद- ५८.५९ टक्के, 
पालघर- ५९.३१ टक्के, 
परभणी- ६२.७३ टक्के,
पुणे -  ५४.०९ टक्के,
रायगड -  ६१.०१ टक्के, 
रत्नागिरी- ६०.३५ टक्के,
सांगली - ६३.२८ टक्के,
सातारा - ६४.१६ टक्के, 
सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के,
सोलापूर -५७.०९ टक्के,
ठाणे - ४९.७६ टक्के, 
वर्धा -  ६३.५० टक्के,
वाशिम -५७.४२  टक्के,
यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सायंकाळी ०५. ०० वाजेपर्यंतची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-

मतदारसंघ             मतदान (अंदाजे)   
१७८-धारावी -         ४६.१५  टक्के  
१७९सायन-कोळीवाडा- ५०.५४  टक्के  
१८०- वडाळा –      ५२.६२  टक्के  
१८१- माहिम –       ५५.२३ टक्के
१८२-वरळी –        ४७.५०  टक्के  
१८३-शिवडी –       ५१.७० टक्के 
१८४-भायखळा –      ५०.४१ टक्के    
१८५- मलबार हिल –    ५०.०८ टक्के
१८६- मुंबादेवी -        ४६.१० टक्के 
१८७- कुलाबा -        ४१.६४ टक्के  

नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.