IND vs AUS; “ट्रेविस हेडला रोखणे कठीण…” भारताच्या माजी प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य
Marathi December 22, 2024 02:24 AM

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील 3 सामने खेळले गेले. दरम्यान ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. तत्पूर्वी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, ट्रेव्हिस हेड (Travis Head) सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रिकेट खेळत असल्याने त्याला ‘थांबवणे फार कठीण’ आहे.

बॉर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) मालिकेतील पहिल्या डावात केवळ 11 धावांवर बाद होऊनही, हेडने त्याच्या पुढील 3 डावात 89, 140 आणि 152 धावा केल्या आहेत. हेडने यापूर्वी 2023च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल आणि वनडे विश्वचषक फायनलमध्ये (ODI World Cup) भारताविरूद्ध शतके झळकावून ऑस्ट्रेलियाला जेतेपद जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये बोलताना रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले, “मला वाटते की तो (ट्रेविस हेड) खूप हुशार आहे. 30 वर्षांपूर्वी मी त्याच्याबद्दल जे पाहिले त्यावरून तो बराच सुधारला आहे असे दिसते. विशेषतः तो ज्या पद्धतीने शॉर्ट बॉल खेळतो. तो सोडायला तयार आहे. तो काही वेळा चांगले सोडणे शिकला आहे. पण तो शाॅर्ट बाॅलला फटके मारण्यास तयार आहे.”

शास्त्री म्हणाले, “तो शाॅर्ट बाॅल चांगल्या प्रकारे ओळखतो. ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे आणि त्याच्याकडे ऑफसाइडसाठी एक उत्तम ब्लेड आहे. त्यामुळे त्याला रोखणे कठीण आहे आणि तो त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

Vijay Hazare Trophy; दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ खेळाडूची तुफानी खेळी, ठोकल्या नाबाद 170 धावा
चॅम्पियन्स ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर! भारत कधी आणि कुठे खेळणार सामने?
मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने गोलंदाजीत घातला धुमाकूळ, घेतल्या 5 विकेट्स

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.