: सध्या देशरात थंडीची प्रचंड लाट आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 10 अंशांच्या खाली गेले. अशा वातावरणात अनेकदा लोक गरम पाणी पिताना दिसतात, काही लोक थंड पाणी पिणेही पसंत करतात. हिवाळ्यात थंड पाणी प्यायल्याने आरोग्य बिघडू शकते असे अनेकांना वाटते. त्यामुळे लोक गरम किंवा कोमट पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानतात. परंतु हिवाळ्यात गरम पाणी प्यावे की थंड हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
काही तज्ञांच्या मते हिवाळ्यात थंड किंवा ताजे पाणी प्यायल्याने शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. थंड किंवा ताजे पाणी पिणे आरोग्यास हानी पोहोचवू शकते याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. परंतु तुम्हाला सर्दी, खोकला किंवा फ्लूचा त्रास होत असेल तर अशा स्थितीत तुम्ही थंड पाणी पिणे टाळावे. अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते. तसेच हिवाळ्यातही योग्य प्रमाणात पाणी प्यावे जेणेकरून डिहायड्रेशनचा धोका होणार नाही. परंतु गरम पाण्याचा विचार केला तर ते हिवाळ्यात अधिक फायदेशीर ठरू शकते.
हिवाळ्याच्या काळात गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत होते असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. मात्र जास्त वेळा गरम पाणी प्यायल्याने शरीरातील हायड्रेशन बिघडू शकते. त्यामुळे पाणी जास्त गरम नसावे आणि वेळोवेळी प्यावे, जेणेकरून डिहायड्रेशन टाळता येईल. आयुर्वेदात गरम पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. एकंदरीत हिवाळ्यात कोमट पाणी पिणे फायदेशीर आहे. परंतु ताजे सामान्य पाणी पिल्याने शरीराला कोणतीही हानी होत नाही. तुम्हाला सर्दी किंवा फ्लूचा त्रास होत असेल तर तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले थंड पाणी पिऊ नये.