Christmas 2024 Special Rangoli Ideas: ख्रिसमसला आता काही दिवसच बाकी राहिले आहेत. पण त्याच्या तयारीला काही दिवसांपासूनच सुरुवात होते. ख्रिसमस हा सण ख्रिस्ती धर्मीय लोकांचा जरी असला तरी हा सण प्रत्येकजण साजरा करतो. आपापल्या परीने ख्रिसमसची सजावट करून हा सण साजरा केला जातो. भारतात देखील हा सण अनोख्या रंगात साजरा केला जातो. अगदी दिवाळीप्रमाणे घर आणि अंगण रंगीत कंदील आणि दिव्यांनी सजवले जाते. काही ठिकाणी तर ख्रिसमसच्या दिवशी रांगोळी देखील काढल्या जातात.