MP Praniti Shinde : तुमच्या मुळेच मला संसदेत काम करण्याची संधी त्यासाठी 'मी पुन्हा येईन'
esakal December 22, 2024 02:45 AM

मोहोळ - मी काँग्रेसची खासदार आहे, त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवणे माझे काम आहे. मी राजकारणात कामे करण्यासाठी आली आहे, टक्केवारी घेण्यासाठी नाही. निवडून येण्यासाठी जनतेची कामे करावी लागतात, मला सत्कारासाठी फुलांच्या माळा ऐवजी कामाच्या निवेदनाच्या माळा ध्या मी प्रत्येक मताची किंमत मोजेन त्यासाठी "मी पुन्हा येईन" असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.

खासदार शिंदे यांनी शनिवारी पापरी व खंडाळी या दोन गावांचा गाव भेट दौरा केला त्यावेळी त्या पापरी ता मोहोळ येथे बोलत होत्या. यावेळी खासदार शिंदे म्हणाल्या, मला संसदेत जाण्याची व कामे करण्याची संधी केवळ तुमच्यामुळे मिळाली, त्यामुळे माझ्याकडे पाठपुरावा करून कामे करून घ्या. तुमच्या हातात छडी आहे तिचा वापर करा.

यावेळी गावकऱ्यांनी मारुती मंदिराच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली, ती खासदार शिंदे यांनी मान्य केली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी शाळेसाठी वॉल कंपाऊंड, विद्यार्थ्यांसाठी सभागृह, संगणक, तसेच शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे त्या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक व्हावी, यासह रस्ते काँक्रिटीकरण, स्मशानभूमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर कट्ट्या जवळ हाय मास्ट बसवावा आदींच्या मागण्याची निवेदने दिली.

खासदार शिंदे यांनी खंडाळी लाही भेट देऊन तेथील नागरिकांचे आभार मानले. यावेळी ग्रामस्थांनी आष्टी उपसा सिंचन योजनेच्या मायनर क्रमांक एक, दोन, तीन व चार ची कामे अपुरी आहेत ती तातडीने पूर्ण करावीत, खंडाळी आष्टी रस्त्याचे आष्टी कडून एक किलोमीटर काम अपुरे आहे ते पूर्ण करावे, तसेच ओढ्यावर पूल बांधावा, कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवावे, आष्टी हे अत्यंत जुने रेल्वे स्टेशन आहे.

पूर्वी या ठिकाणी मिरज, कोल्हापूर, सांगोला या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे थांबत होत्या, मात्र ते थांबे आता बंद झाल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली आहे त्यामुळे ते थांबे पूर्ववत करावेत, दत्त व जोतिबा मंदिर बांधकामासाठी निधी द्यावा अशा मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी सुलेमान तांबोळी, राजेश पवार, संतोष शिंदे, गणेश मुळे, सतीश भोसले, सरपंच जयश्री कोळी, उपसरपंच अमोल पाटील आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.