Budget Smartphone: फ्लिपकार्ट सेलमध्ये मोठा डिस्काउंट! 8000 रुपयांत खरेदी करा 5G स्मार्टफोन
Times Now Marathi December 22, 2024 07:45 AM

, : ई कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डे सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सवलत दिली जात आहे. तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये तुम्हाला अतिशय स्वस्त दरात 8000 रुपयांच्या आत 5G स्मार्टफोन खरेद करता येणार आहे. या सेलमध्ये 8000 रुपयांच्या आत तीन जबदस्त स्मार्टफोनचे पर्याय उपलब्ध आहेत. कोणते आहेत हे स्मार्टफोन जाणून घेऊयात.

फ्लिपकार्ट सेल मध्ये अनेक डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहेत. तुम्ही देखील बऱ्यात काळापासून नवीन 5G फोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा 3 अगदी स्वस्त आणि जबरदस्त स्मार्टफोनविषयी माहिती देत आहोत. फक्त 8 हजार रुपये किंवा त्याहून कमी बजेट असेल तर या किंमत श्रेणीमध्ये तीन बेस्ट डील्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या यादीतील एका डिव्हाइसमध्ये सोनी कॅमेरा आहे जो इतर कोणतीही कंपनी देत नाही. इतकंच नाही तर प्लॅटफॉर्मवर सुरु असलेल्या डिस्काउंट ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही अगदी स्वस्त किंमतीत हे डिव्हाइस खरेदी करू शकता.

itel P55 5G
तुम्ही 8,000 रुपयांच्या बजेटमध्ये 5G फोन शोधत असाल तर तुम्ही itel P55 5G खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची किंमत सध्या 8,440 रुपये आहे. बँक ऑफर्ससह तुम्हाला फोनवर 675 रुपयांची सूट देखील मिळत आहे. यामुळे फोनची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी होईल. या फोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे. डिव्हाइसमध्ये 6.6 इंच HD+ डिस्प्ले आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात 50MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. एवढेच नाही तर यात 5000mAh ची बॅटरी आणि MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर आहे.





SAMSUNG Galaxy A14 5G
तुम्हाला सॅमसंगचा 5G फोन स्वस्तात घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बँक ऑर्ससोबतच एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यावा लागेल. या फोनची किंमत सध्या 11,999 रुपये आहे. परंतु तुम्हाला Flipkart Pay Later EMI द्वारे 500 रुपयांची सूट आणि एक्सचेंज ऑफरसह 4000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यामुळे या फोनची किंमत 8 हजार रुपयांपेक्षा कमी होईल.





POCO C75 5G
या यादीतील तिसरा फोन POCO C75 5G हा अलीकडेच लाँच झालेल्या सर्वात स्वस्त 5G फोनपैकी एक आहे. याची सुरुवातीची किंमत फक्त 7999 रुपये आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये 50MP सोनी कॅमेरा आहे. एवढेच नाही तर या फोनमध्ये खास AI फीचर्स देखील उपलब्ध आहेत, त्यामुळे तो आणखी खास बनतो. डिव्हाइसमध्ये 5160 mAh बॅटरी आणि 4s Gen 2 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 19 डिसेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.