Cooking Tips : अंडा करी बनवताना टाळाव्या या चुका
Marathi December 22, 2024 03:24 PM

अंड एक पूर्ण अन्न असून यात विविध पोषक आढळतात. अंड शरीरासाठी पौष्टिक अन्न असल्याने दररोज एक तरी अंड खावे असा सल्ला दिला जातो. अंडी गरम असल्याने शरीर उबदार ठेवण्यासाठी हिवाळ्यात आवर्जून अंडी खायला हवीत. अंडी काहीजण उकडून खातात तर काहीजण ऑम्लेट किंवा अंडा करी बनवून खातात. अंडा करी कित्येकजणांच्या आवडीची असते. गरमा गरम चपाती किंवा भातासोबत अंडा करी खूप छान लागते. पण, काही महिला अंडा करी बनवताना काही चूका करतात, ज्यामुळे सर्व बेत फसतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अंडा करी बनवताना तुम्ही कोणत्या चूका करणे टाळायला हवे, हे सांगत आहोत.

अयोग्य प्रमाणात पाणी –

अंडा करी बनवताना एकतर जास्त पाणी पडते तर काहीकडून खूपच कोरडी होते. अंडा करीची चव ही पूर्णत: तुम्ही किती पाणी टाकता त्यावर अवलंबून असते. त्यामुळे अंडा करीच्या ग्रेव्हीसाठी लागेल इतकेच पाणी घ्यावे.

मसाल्यांचा वापर-

ग्रेव्हीमध्ये जर योग्य मसाले आणि चवीपूरचे मीठ नाही घातल्यास त्याची चव बदलू शकते. याशिवाय चुकून मीठ, मसाले जास्त झाले असतील तर नारळाचे दूध, दही तुम्ही वापरू शकता.

अंडी व्यवस्थित न उकडणे –

अंडी उकडताना चुका हमखास होतात. काही वेळा कच्ची राहतात तर कधी जास्त शिजतात. यामुळे अंड्याची चव आणि आकार दोन्ही खराब होतात. अशा परिस्थितीत, त्यामुळे अंडी कमीत कमी 10 ते 15 मिनिटे तरी उकळण्यास ठेवावीत. यानंतर सोलण्याआधी थंड पाण्यात ठेवावीत.

मसाले न शिजविणे –

कांदा, लसूण, आले आणि टोमॅटोसारखे मसाले अंडा करीमध्ये वापरले जातात. पण, कांदा, टोमॅटो कच्चे राहीले तर ग्रेव्हीची चव बदलू शकते. त्यामुळे मसाले कायम मंद आचेवर शिजवावेत आणि कढीपत्ता तेलात पूर्ण शिजवावा.

अंडी या पद्धतीने टाका –

अंडा करी बनवताना अंडी चुकूनही तेलात न तळता ग्रेव्हीत टाकू नये. याने चव बिघडते. अंडी ग्रेव्हीत टाकण्याआधी काट्याने त्यावर टोचे मारून चिमुटभर हळद, मसाला टाकून तळून घ्यावेत आणि त्यानंतर ग्रेव्हीच टाकावेत, असे केल्याने ग्रेव्हीची चव दुप्पट होते.

 

 

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.