Christmas Special Trains 2024: प्रवाशांनो लक्ष द्या..! नाताळनिमित्त नाशिकमधून धावणार विशेष रेल्वे गाड्या
Christmas Special Trains 2024: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गाड्यांसंदर्भात ही अपडेट आहे. नाताळ आणि हिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मध्य रेल्वे नासिक ते धनबाद आणि रिवा ते मडगाव दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. नाताळ आणि हिवाळी सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे.
अशा आहे विशेष रेल्वे गाड्या आणि वेळापत्रक
नाशिक - धनबाद गरीबरथ विशेष गाडी (8 सेवा)
रेल्वे गाडी क्रमांक 03398 गरीबरथ विशेष ही रेल्वे 22 डिसेंबर 2025 ते 02 जानेवारी 2025 दरम्यान प्रत्येक गुरुवार आणि रविवारी नाशिक येथून सकळी 8 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी धनबाद येथे रात्री 09 वाजता पोहचेल.
रेल्वे गाडी क्रमांक 03397 गरीबरथ विशेष ही गाडी 20 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार रोजी धनबाद येथून रात्री 11 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी नाशिक येथे सकाळी 07 वाजता पोहचेल.
थांबे - मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबळपूर, न्यू कटनी, सिंगरुळी, चोपण, रेनूकूट, गरवा रोड, डाल्टनगंज, बरवाडीह, लतेहार, टोरी, खलारी, पत्रातू, बरका काना, रांची रोड, गुमीया, बोकारो, चंद्रपूरा, कत्रासगढ.
सरंचना - 20 तृतीय वातानुकूलित, 1 लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.
रिवा - मडगांव विशेष गाडी (04 सेवा)
रेल्वे गाडी क्रमांक 01703 ही विशेष गाडी 22 डिसेंबर 2024 आणि 29 डिसेंबर 2024 रोजी रिवा येथून दुपारी 12 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मडगाव येथे रात्री 09 वाजून 25 मिनिटांनी पोहचेल.
रेल्वे गाडी क्रमांक 01704 ही विशेष गाडी 23 डिसेंबर 2024 आणि 30 डिसेंबर 2024 रोजी मडगाव येथून रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रिवा येथे सकाळी 08 वाजून 20 मिनिटांनी पोहचेल.
थांबे- सतना, मैहर, कटनी, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळून, रत्नागिरी, कंकावली, कुडाल, सावंतवाडी रोड ,थिविम आणि करमाळी.
संरचना - एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, 5 तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 2 लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी संरचना या गाडीची राहणार आहे. या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.