भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून शेवटच्या दोन कसोटी सामने शिल्लक आहे. या दोन कसोटी सामन्यांवर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित सुटणार आहे. असं असताना भारत इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. इंग्लंडचा संघ 22 जानेवारीला भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यासाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केलं. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर पाच सामन्यांची टी20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारत आणि इंग्लंडची लिटमस चाचणी होणार आहे. या नंतर दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा वनडे फॉर्मेटमध्ये आहे. यासाठी इंग्लंडने आतापासूनच कंबर कसली आहे.
इंग्लंड 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान भारताविरुद्ध पाच टी20 सामने खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना होण्यापूर्वी दोन्ही संघ 6 ते 12 फेब्रुवारी दरम्यान तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभागी होतील. इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सला या संघातून डावलण्यात आलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे निवडीसाठी विचार करण्यात आलेला नाही. जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सट, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स आणि साकिब महमूद यांच्यासारख्या खेळाडूंनी इंग्लंडचा वेगवान मारा सक्षम झाला आहे. आदिल रशीद हा फिरकी गोलंदाजीचा पर्याय आणि जेकब बेथेल, जो रूट हे बॅकअप पर्याय असतील.
इंग्लंड पुरुष एकदिवसीय संघ, भारत दौरा आणि आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी : जोस बटलर (कर्णधार),,जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड
इंग्लंड पुरुष टी20 संघ : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जॅमरशायर, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट,मार्क वुड.