Pushpa 2 Collection: 'पुष्पा 2'चा तिसऱ्या रविवारी डंका; 'बाहुबली'ला टाकले मागे, एकूण कमाई किती?
Saam TV December 23, 2024 02:45 PM

'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2) हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून जगभरात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आता 'बाहुबली 2' रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' तिसऱ्या संडेलाही बंपर कमाई केली आहे. आता 'पुष्पा 2: द रुल' भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन 18

मीडिया रिपोर्टनुसार, '2: द रुल' चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात बंपर कमाई केली आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 725.8 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटींची कमाई केली. अखेर तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी 'पुष्पा 2' चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,'पुष्पा 2' चित्रपटाने तिसऱ्या (Pushpa 2 Box Office Collection Day 18) 33.25 कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1062.9 कोटींची बंपर कमाई केली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजच्या 18 दिवसात 'बाहुबली 2' चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. '2' चे कलेक्शन 1030.42 कोटी रुपये आहे.

'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाने तेलुगु आणि हिंदी भाषेत सर्वात जास्त कमाई केली आहे. चित्रपटाने हिंदी भाषेत 679.65 कोटी रुपयांचे जबरदस्त कलेक्शन केले आहे. तसेच तेलगूमध्ये 307.8 कोटी रुपये, तामिळमध्ये 54.05 कोटी रुपये, कन्नडमध्ये 7.36 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 14.04 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.