धार्मिक दृष्टीकोनातून तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते. तुळशीच्या पानांचा वापर भगवान शिव आणि गणपतीची पूजा वगळता जवळपास सर्व प्रकारच्या पूजेमध्ये केला जातो. हे विशेषत: भगवान विष्णूच्या पूजेमध्ये वापरले जाते. असे मानले जाते की भगवान विष्णूला तुळशी रोप खूप आवडते. यामुळेच तुळशीला विष्णुप्रिया असेही म्हणतात. तुळशीचे रोप पूजनीय मानले जाते. असे मानले जाते की घरात तुळशीचे रोप लावून त्याला नियमित पाणी अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. शास्त्रात तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचे रुप सांगितले आहे. म्हणजेच जिथे तुळशी असते तेथे माता लक्ष्मीचा वास असतो. याशिवाय तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो. चला तर जाणून घेऊया तुळशीचे रोप लावून त्याची नियमित पूजा केल्याने कोणते फायदे होतात.
घर खरेदी करताय? 'या' चुका तुम्हाला पडू शकतात महागातधार्मिक शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाखाली दिवा लावून पूजा करावी. त्या व्यक्तीची देवता दोष नाहीसे होतात. तुळशीसोबतच भगवान विष्णूची कृपाही तुम्हाला मिळेल.
istock
नकारात्मक ऊर्जा नष्ट होतेघरात तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तूमध्येही तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले जाते. वास्तूनुसार तुळशीचे रोप आर्थिक स्थितीसाठीही शुभ मानवे जाते.
तुम्हाला तुमच्या हनिमूनचा पुरेपूर आनंद घ्यायचा? मग, नियोजन करताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी
istock
मनाला शांती मिळते (The mind gets peace)घरामध्ये तुळशीचे रोप लावून त्याची नियमित पूजा केल्याने मनाला शांती मिळते. तसेच तुळशीचे रोग घरामध्ये संकटे येण्यापासून रोखते.
VIsa Free Countries For Indians: परदेशात फिरायला जायचे आहे?भारतीयांना या देशांमध्ये व्हिसाची गरज नाही
iStock
तुळशीचे रोप लावताना लक्षात देवा या गोष्टी (Keep these things in mind while planting Tulsi)असे म्हणतात की चुकीच्या दिशेने लावलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरात अशांतता येते तुळशीच्या रोपासाठी सर्वोत्त दिशा उत्तर आणि ईशान्य मानली जाते. हे रोप घराच्या दक्षिण दिशेला कधीही ठेवू नये.
Air Purifire पेक्षा कमी नाहीत 'हे' ५ इनडोअर प्लांट
istock
घराच्या छतावर तुळशीचे रोप कधीही लावू नये. त्यामुळे कर्जाची समस्या किंवा आर्थिक समस्या कायम राहतात. या व्यतिरिक्त, जर तुम्ही एकापेक्षा जास्त तुळशीचे रोपे लावत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही ही रोपे ३, ५, ७ अशा विषय संख्येने लावावी.
Indoor Plant : हिवाळ्यात करा 'या' सुंदर फुलझाडांची लागवड