Beed Crime Update : संतोष देशमुख हत्येप्रकरणी खासदार सोनवणेंचा धक्कादायक खुलासा, तब्बल 56 वेळा...
Beed Crime Update : बीड जिल्ह्यातील मयत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केज येथे पत्रकार परिषद घेत यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देशमुख यांना 56 ठिकाणी मारहाण करून त्याचा जीव घेतला गेला असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे तसेच उर्वरित 3 आरोपी तात्काळ ताब्यात घ्या अन्यथा 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा काढणार असून लवकरात लवकर या गोष्टी न झाल्यास या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचेही म्हटले आहे.
हे प्रकरण मे महिन्यात सुरू झाले असून याबाबत 28 नोव्हेंबर रोजी अवाडा कंपनीच्या पावन चक्की येथील अधिकाऱ्याकडे खंडणी मागण्यात आली, तर 6 डिसेंबर रोजी याच कंपनीच्या केज येथील मस्साजोग येथील ऑफिसमध्ये जाण्याच्या वादातून कंपनीचे गार्ड सोनवणे यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये पोलीस विभागाने घडलेल्या घटनेप्रमाणे गुन्हा न नोंद करता वेगळ्या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपींचा जमीन करण्यात आला.
...म्हणून कोणाचा कॉल आलामात्र या घटनेमध्ये गुन्हा दाखल करू नका म्हणून कोणाचा कॉल आला ते तपासणे अत्यावश्यक आहे असे असेही बजरंग सोनवणे यांनी यावेळी नमूद केले आहे. 9 डिसेंबर रोजी आरोपींचा जामीन होऊन ते बाहेर आले आणि यावेळी पी एस आय देखील आरोपींसोबत फिरत होते. यानंतर काही वेळातच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करून त्यांना जबरदस्तीने गाडीत घेऊन त्यांना टॉर्चर करून त्यांना जीव मारले आहे.
या हत्या प्रकरणात 56 ठिकाणी मारहाण करून त्याचा जीव घेतला गेला. मयत सरपंच संतोष देशमुख याचा नेमका काय गुन्हा होता. त्याने त्यांच्या गावच्या नागरिकाला सहकार्य केल्यामुळे अशी सजा देण्यात आली असल्याचेही सोनवणे यांनी म्हटले आहे.
4 आरोपी पोलिसांच्या ताब्यातया प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील खंडणीमध्ये व जीवे मारण्यामध्ये जो आरोपी आहे त्याला नेमके पोलिसांनी ताब्यात घेतले की तो स्वतः सरेंडर झाला याचा देखील खुलासा होणे गरजेचे आहे
बाकीच्या 3 आरोपींना अद्याप का अटक का नाही?घटना घडून आज 15 दिवस झाले बाकीच्या 3 आरोपींना अद्याप का अटक करण्यात आलेली नाही असा आरोपही या पत्रकार परिषदेत घेऊन खा बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
3 केसेस क्लब केल्याआज प्रशासनाने या प्रकरणातील 3 केसेस क्लब केल्या आहेत याचा अर्थ असा की, या तिन्ही केस एकमेकांशी जोडून असल्याच्या कारणावरून त्याचा तपास सुरू आहे. 15 दिवसात या केसमध्ये फक्त एस पी बदलला आहे मात्र या प्रकरणात अद्याप काहीही प्रगती झालेली नाही. या गुन्हेगारांचे सीडीआर काढल्यास त्यांच्या किती प्रॉपर्टी आहेत आणि कोणाच्या नावाने आहेत ते समोर येईल तसेच यांचे कोणाशी काय संबंध आहेत ते देखील समोर येईल असा प्रश्न खा बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
सत्ताधाऱ्यांनी राजकारण करू नयेया प्रकरणात कोणी म्हणत आहे की याला राजकीय रंग देण्यात येत आहे तर कोणी म्हणतंय की याला जातीय रंग दिला जात आहे. मात्र असे काही नाही असा खुलासाही या प्रकरणी सोनवणे यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी राजकारण करू नये तर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी आपण आवाज उठवावा असेही सोनवणे पुढे म्हणाले.
बीडच्या पालकमंत्री कोण होणार?बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोणाला करायचे याच्याशी मला काही घेणं नाही. सत्ताधारी पक्षातील वरिष्ठांनी तो नेमावा. या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित दादांनी हे पद घ्यावे आणि या प्रकरणातील तपास करून मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल. मात्र जो बीडचा बिहार होत आहे याला कारणीभूत कोण आहे हे तपासण्यासाठी प्रशासनाने त्या दृष्टीनेही चौकशी करणे आवश्यक आहे.
या गुन्हेगारांचे सीडीआर काढानिवडणुकीच्या काळात तुम्ही आमचा सी डी आर काढत होतात आता तुम्ही या गुन्हेगारांचा सी डी आर काढा. बीड जिल्ह्यात नवनियुक्तीवर आलेले एस पी यांचे अभिनंदन मात्र त्यांनी या गुन्हेगारांचे सीडीआर काढावेत. जिल्ह्यात अद्याप अनेक पी एस आय आहेत त्याच्या बदल्या होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आज ही अवैध धंदे सुरू आहेत ते बंद करून जिल्ह्यात कायदा अन् सुव्यवस्था आबाधित राहील.
त्यांना फाशीची शिक्षा द्यावीप्रत्येकाची वेळ अन् काळ येतो म्हणत येणाऱ्या 28 तारखेला सर्व पक्षीय मोठा मोर्चा बीड येथे काढण्यात येणार आहे. या प्रकरणातील अन्य गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही सोनवणे यांनी यावेळी केली आहे. येत्या 1 तारखेपर्यंत जर आरोपींना अटक झाली नाही तर मग मी स्वतः रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असा इशारा ही या पत्रकार परिषदेत दिला आहे.
लायसन्ससाठी शिफारस कोणी केलीबीड जिल्ह्यात सर्वाधिक रिव्हॉल्वर लायसन असण्याचे कारण म्हणजे ज्यांनी या लायसन्ससाठी शिफारस कोणी केली हे आधी तपासणे आवश्यक आहे.