अहेरी नगरपंचायत मागील तिन वर्षांपासून सतत वादाच्या भोवर्यात आहे. नियमबाह्य निवीदा प्रक्रीया असो की सत्ताधार्यांचे विविध प्रकरणातील वादातुन कंत्राटदारांवर अॅट्राॅसीटीचे प्रकरण असो सतत विवादात राहीले आहे.चक्क मुख्याधिकारींविरोधात सुध्दा अॅट्राॅसिटी अॅक्ट अंतर्गत खुद्द नगराध्यक्षांनी तक्रार नोंदविली होती.
नगरपंचायत मध्ये अजय कंकनालवार गटाची सत्ता होती.शिवसेना (ऊबाठा) व राष्ट्रवादीच्या फुटीर गटाच्या मदतीने सत्ता स्थापित केली होती.सुमारे अडीच वर्षांपुर्वी अजय कंकनालवार यांच्या शासकीय जागेवरच्या अतिक्रमणाला अभय देणारा ठराव सत्ताधारी नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर पारित केला होता.
नगरसेवकपदाच्या दुरुपयोगाविरोधात भाजप गटातर्फे जिल्हाधिकारी न्यायालयात फिर्याद नोंदविली गेली.मागिल दोन वर्षांपासुन सदर प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागुन होते.
बघता बघता अडीच वर्षे लोटली त्यामुळे निकाल लागेपावेतो सत्ताधार्यांचा कार्यकाळ संपेल काय? अशी शंका देखील व्यक्त केली जात होती.काल जिल्हाधिकारींनी त्या प्रकरणाचा निकाल देत सत्ताधारी गटाच्या सर्वच ९ नगरसेवकांना अपात्र घोषीत केले.
कालच जिल्हाधिकार्यांची बदली झाली हे विशेष.जाता जाता शेवटच्या क्षणी निकाल देऊन त्यांनी जोरका धक्का दिला अशी सर्वत्र चर्चा आहे.