IND vs AUS: मिया मॅजिक! Mohammed Sirajने बेल्स बदलत पुन्हा केली जादू अन् बुमराहच्या गोलंदाजीवर ख्वाजा परतला
esakal December 26, 2024 10:45 PM

IND vs AUS 4th Test : आज ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात ६ विकेट्स गमावत ३११ धावांचा टप्पा गाठला. ज्यामध्ये उपकर्णधार जस्प्रीत बुमराहला तिन विकेट्स घेण्यात यश आले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पहिल्या दिवशी विकेट मिळली नाही, असे असले तरी संपुर्ण मालिकेमध्ये चर्चेत असलेला सिराज या सामन्यात पुन्हा चर्चेत आला. गॅबा कसोटीदरम्याम सिराज लाबुशेनमध्ये जो संवाद पाहायला मिळाले, त्याची मेलबर्न कसोटीमध्ये पुनरावृत्ती झाली.

झालं असं की, लाबुशेन फलंदाजी करत असताना ४२.२ षटकात मोहमद्द सिराजने बेल्सची अदलाबदली केली आणि ४४ षटकाच्या पहिल्या चेंडूवर बुमराहने ख्वाजाला बाद केला.

तिसऱ्या कसोटी सामन्यातही असाच किस्सा घडला होता. ३३ व्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी आला. यावेळी त्याने चेंडू टाकल्यानंतर तो फलंदाजी करणाऱ्या लाबुशेनजवळून गेला आणि स्टंपवरील बेल्स बदलले, यावेळी सिराज आणि लाबुशेन यांच्यात काहीतरी संवादही झाला.त्यानंतर सिराज मागे फिरला, त्याच्यासोबत शुभमन गिलही होता. यावेळी सिराज मागे फिरल्यावर लॅबुशेनने पुन्हा स्टंपवरील बेल्स बदलले. तथापि, या षटकाच्या पुढच्याच षटकात लाबुशेनला नितीश रेड्डीने १२ धावांवर बाद केले.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सुरूवातीच्या तारही फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. सॅम कॉन्स्टासने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात अर्धशकी खेळी केली. सॅम कॉन्स्टास व उस्मान ख्वाजाने पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. २० व्या षटकात जडेजाच्या गोलंदाजीवर सॅम ६० धावांवर बाद झाला.

उस्मान ख्वाजाने ५७ धावा केल्या. तर मार्नस लाबुशेनने १४५ चेंडूत ७२ धावांचे योगदान दिले. ट्र्रॅव्हिस हेड शून्यावर माघारी परतला, अॅलेक्स केरीने ३१ धावा केल्या, तर मिचेल मार्शला ४ धावा करता आल्या. सध्या स्टीव्ह स्मिथ ६८ व पॅट कमिन्स ८ धावांवर नाबाद आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.