हे होते २०२४ मधील सगळ्यात वाईट मराठी चित्रपट; कुणी सांगितली खोटी कमाई तर कुणी आठवणींचा वाजवला बँड, वाचा यादी
esakal December 26, 2024 10:45 PM

२०२४ हा वर्ष मराठी सिनेमासाठी तसं फारसं चांगलं नव्हतं. 'नाच गं घुमा' सोडला तर इतर चित्रपटांनी फारशी चांगली कमाई केली नाही. मात्र काही चित्रपटांनी चांगली कमाई केली नसली तरी त्यांची कथा आणि दिग्दर्शन उत्कृष्ट होतं. यावर्षी तब्बल १०० हुन अधिक मराठी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. मात्र त्यातील बहुतेक चित्रपट ऍव्हरेज होते. आता आम्ही तुमच्यासाठी यावर्षीच्या वाईट सिनेमांची यादी घेऊन आलो आहोत. त्यातील काहींनी तर खोटी कमाई देखील सांगितली. तर काहींनी प्रेक्षकांच्या आठवणींचा बँड वाजवला.

mushak akhyan

१. यावर्षीच्या सगळ्यात वाईट चित्रपटाचा यादीत पहिल्या क्रमांकावर आहे 'मूषक आख्यान' हा चित्रपट. यात अभिनेते मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत होते. त्यांच्या करिअरमधील हा अत्यंत वाईट चित्रपट असल्याचं समीक्षकांचं म्हणणं आहे.

lek asavi tar ashi

२. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे विजय कोंडके यांचा 'लेक असावी तर अशी' हा चित्रपट. 'माहेरची साडी' या चित्रपटानंतर तब्बल २४ वर्षांनी त्याच धाटणीचा सिनेमा बनवणं दिग्दर्शक आणि निर्मात्यांना महागात पडलं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल फेल ठरला.

३. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे 'कर्मवीर आबासाहेब'. अनिकेत विश्वासराव याची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर डिझास्टर ठरला. हा सिनेमा आबासाहेब यांच्या आयुष्यावर आधारित असला तरी खऱ्या आयुष्यासोबत त्याचा काहीएक संबंध नव्हता. या चित्रपटाने केवळ ५८ लाखांची कमाई केली असताना निर्मात्यांनी खोटी कमाई दाखवत याने ३ कोटींची कमाई केल्याचं सांगितलं होतं.

४. नंबर ४ वर आहे 'रानटी'. शरद केळकर यांचा 'रानटी' एक ऍक्शन मुव्ही होता. दशकातील सगळ्यात मोठा ऍक्शन चित्रपट अशी जाहिरात करणारा हा चित्रपट कथानकात मार खाऊन गेला. अतिशय सुमार अशा चित्रपटाकडे सगळ्यांनी पाठ फिरवली होती.

५. प्रथमेश परब याचा 'डिलिव्हरी बॉय' हा चित्रपट यात पाचव्या नंबरवर येतो. या चित्रपटात बी ग्रेड संवाद आणि कथेशिवाय इतर काहीच नव्हतं. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

६. चांगला मुद्दा, चांगले कलाकार असूनही कथानकात मार खाल्याने फ्लॉप ठरलेला चित्रपट म्हणजे 'गुलाबी'. यात मृणाल उलकर्णी, अश्विनी भावे', श्रुती मराठे मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटानेही प्रदर्शपूर्वीच १ कोटींची कमाई केल्याचं पोस्टर शेअर केलं होतं.

७. 'बाबू' हा चित्रपट या यादीत सातव्या क्रमांकावर आहहे. या चित्रपटात अंकित मोहन नेहा पेंडसेसारखे उत्तम कलाकार होते. मात्र कथानक चांगलं नसल्याने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मार खाल्ला.

८. आश्चर्य वाटेल पण या यादीत सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी यांचा 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपटही आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली तरी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. 'नवरा माझा नवसाचा' च्या आठवणी मनात घेऊन प्रेक्षकगृहात गेलेल्या प्रेक्षकांची या चित्रपटाने निराशा केली. वाईट कथा, संवाद, खोटे सेट यामुळे हा चित्रपट यावर्षीच्या वाईट चित्रपटांच्या यादीत येतो.

ek daav bhutacha

९. पुढे आहे मकरंद अनासपुरे यांचा 'एक डाव भुताचा'. या कॉमेडी- हॉरर चित्रपटात कॉमेडी आणि हॉरर दोघेही नव्हते. मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या स्टारडमचाही या चित्रपटाला काहीही उपयोग झाला नाही.

१० या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे स्वप्नील जोशी याचा 'बाई गं'. सहा पत्नीचा एक नवरा आणि अभिनेत्याचे ६ जन्म दाखवण्याच्या नादात हा चित्रपट चांगलाच गंडला. हा चित्रपट थिएटर मध्ये पाहणाऱ्यांनी या चित्रपटाला वाईटच म्हटलं होतं.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.