सध्या प्राजक्ता कोळी तिच्या नेटफ्लिक्सवरील ‘मिसमॅच्ड’या सीरिजच्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर हा सीझन १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून मिसमॅच्डला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच, सीरिज मधले गाणे चांगलेच गाजताना दिसत आहे.
प्राजक्ता कोळी व रोहित सराफ सोबत रणविजय सिन्हा, विद्या माळवदे, एहसास चन्ना, मुस्कान जाफरी यांसारख्या कलाकारांनीही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
प्राजक्ताने लोकलमधील प्रवासाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती रिकाम्या लोकलमध्ये बसलेली आणि दारात उभी राहिलेली दिसते. व्हिडीओतील साधेपणामुळे तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे, तर रिकामी लोकल पाहून काहींनी गंमतीशीर प्रश्नही विचारले आहेत.
प्राजक्ताने हिरव्या रंगाचा चिकनकारी कुर्ता परिधान केला आहे. पोस्टमध्ये ‘मुंबई’असं कॅप्शन देत लाल रंगाचा हार्ट इमोजी जोडला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
सिनेविश्वातील अनेक कलाकार वेळेची बचत करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधार घेतात. त्यात मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल किंवा मेट्रोचा वापर अनेक कलाकार करतात.