तेव्हा प्राजक्ता माळीवर भडकलेली अमृता खानविलकर; फोन करून घातलेल्या शिव्या, अभिनेत्रीने स्वतः सांगितलेला किस्सा
esakal December 26, 2024 10:45 PM

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडून मोठ्या पडद्यावर झेप घेणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नेहमीच वेगवेगळ्या भूमिका निवडण्यावर भर दिला. ती कायम वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'फुलवंती' मधील तिचा अभिनय आई नृत्य पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले. मात्र तिने 'रानबाजार' या सीरिजमध्ये केलेली भूमिका प्रचंड गाजली. त्यावरून तिला ट्रोलही करण्यात आलं. सुरुवातीला तिने ही सीरिज सोडली होती मात्र तेव्हा अमृता खानविलकरने तिला फोन करून शिव्या घातल्या होत्या. वाचा नेमकं काय घडलेलं?

सोडलेली रानबाजार सीरिज

महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने याबद्दल सांगितलं होतं. मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, 'प्रोजेक्ट निवडताना आपण विचार करतो की, आपली इमेज काय आहे, प्रेक्षकांना कसं वाटेल? ते कशी प्रतिक्रिया देतील. रानबाजारच्या वेळी मी यातून गेले होते. मला स्क्रिप्ट प्रचंड आवडलेली. ती सेक्स वर्करची भूमिका होती. बरं पूर्ण सीरिजमध्ये काय नव्हतं. परंतू टीझर त्यांच्या डोक्यात ते ठरलेलाच, की असंच करायचं. त्यामुळं टीझर असाच असणारंच आहे, ट्रोलिंग होणार आहे हे पण माहितीचं होतं. करायचं की नाही, खूपच गोंधळ होता.'

अमृताने केलेला फोन

त्यानंतर ती म्हणाली, 'मी खरं तर सोडली होती रानबाजार सीरिज. एक नरेशन मी नसताना झालं ही होतं. मग मला अमृता खानविलकरनं खूप शिव्या घातल्या. वेडी आहेस का तू? अभिजीत पानसेंसोबत काम करायला मिळतंय, तू काय करतेय? असं ती म्हणाली. त्यानंतर प्रसाद ओकही ओरडले. आता काय विचार वगैरे करू नको, करून टाक, असंही ते म्हणाले होते.'

यानंतर प्राजक्ताने ही भूमिका केली आणि ती गाजली देखील. तिच्या अभिनयातील एक वेगळा पैलू प्रेक्षकांसमोर आला. प्राजक्ता सध्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी १२ ज्योतीर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी गेली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.