डिजिटल इंडियाची ताकद वाढली, तरुणांसाठी नोकरीच्या संधीत मोठी वाढ, महिलांना अधिक संधी
Marathi December 26, 2024 11:24 PM

डिजिटल इंडिया: भारतीय कंपन्यांमध्ये ऑनलाइन नोकरीच्या (Job) संख्येत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडिया ॲट वर्क 2024 च्या अहवालात याबाबतची माहिती दिली आहे. लघु आणि मध्यम व्यवसायात डिजिटल वापरामुळं म्हणजे SMB क्षेत्रात आणि टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये त्यांच्या व्यवसायाचा विस्तार केल्यामुळं नोकरीच्या संख्येत वाढ झाली आहे.

BFSI, रिटेल, हेल्थकेअर मध्ये अधिक पोस्टिंग

अहवालानुसार, BFSI, रिटेल, हेल्थकेअर, IT-ES, शिक्षण आणि उत्पादन यासारखे प्रमुख उद्योग नोकरभरतीत आघाडीवर आहेत. अहवालात पुढे म्हटले आहे की HDFC एर्गो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टायटन सारख्या आघाडीच्या NIFTY 100 कंपन्यांनी देखील मुख्य भूमिकांसाठी भरतीसाठी Apna ला घेतले आहे. डिलिव्हरी आणि मोबिलिटी मधील Gig भूमिकांनी फूड एग्रीगेटर्स, वाहतूक आणि ई-कॉमर्स कंपन्यांकडून  या जॉब पोस्टिंगपैकी 45 टक्के नॉन-मेट्रो क्षेत्रातून आले आहेत. जयपूर, लखनौ आणि इंदूर सारख्या शहरात देखील मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. तर वाराणसी, रायपूर आणि डेहराडून सारख्या 3 शहरांमध्येही नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

महिलांसाठी नोकरीच्या संधी वाढल्या

अहवालानुसार, महिलांसाठी नोकरीच्या संधी  दरवर्षी 60 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, 2024 मध्ये SMB क्षेत्रात (small and medium-sized business) नवीन लोकांची नियुक्ती करण्यासाठी नवीन पावले उचलली गेली. यामध्ये 9 लाख नोकऱ्या जाहीर झाल्या आहेत. 2023 मध्ये 20 टक्के नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. SMB क्षेत्रात 63 दशलक्षाहून अधिक उपक्रम आहेत, जीडीपीमध्ये 30 टक्के योगदान देते आणि देशभरातील लाखो लोकांना रोजगार देते. SMB ला देशभरातून 6 कोटी नोकरीचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

कोरोना काळानंतर देशातील रोजगार क्षेत्राला अच्छे दिन आले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षात उत्पादन क्षेत्रातील उद्योगांमध्ये रोजगारात वाढ झाली आहे. ताज्या सरकारी आकडेवारीनुसार, उत्पादन उद्योगांमधील एकूण अंदाजित रोजगारामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मजबूत वाढ झाली आहे. तामिळनाडू, महाराष्ट्रगुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही राज्य उत्पादन क्षेत्रात सर्वाधिक लोकांना रोजगार देणारी शीर्ष पाच राज्ये आहेत. ही राज्ये मिळून एकूण उत्पादन क्षेत्रातील रोजगारामध्ये सुमारे 55 टक्के योगदान देत आहे. रोजगारात वाढ झाल्यामुळं लोकांच्या आर्थिक उत्पन्नात देखील वाढ होत असल्याचं चित्र पाहाययला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी, ‘ही’ कंपनी 2000 कोटींची गुंतवणूक करणार, 6000 नवीन नोकऱ्या मिळणार

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.