:- नंदकुमार बस्वदे
AAP Congress Conflict Reasons: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीतील मित्रपक्षांतील वाद वाढला आहे. यामुळे इंडिया आघाडीचे ऐक्य धोक्यात आले आहे. काँग्रेसला इंडिया आघाडतून बाहेर काढण्यासाठी आप इतर पक्षांशी चर्चा करणार.
काँग्रेस भाजप सोबत मिळून काम करत असल्याने काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा करणार असल्याचे आम आदमी पार्टी काढून सांगण्यात आले आहे. या बाबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री अतीशी व आपचे वारिष्ठ नेते संजय सिंग पत्रकार परिषद घेणार आहेत.
आप आणि काँग्रेसमध्ये वाद का होतोय?दिल्ली युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय लाकडा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल केली होती.
काँग्रेसने आम आदमी पार्टी विरूद्ध श्वेतपत्रिका प्रकाशित केली आहे.
काँग्रेस सरचिटणीस अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांचा 'फर्जीवाल' असा उल्लेख केला होता.
दोन्ही पक्षांची राजकीय महत्वकांक्षा यामुळे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत.
दरम्यान, दिल्ली युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय लाकडा यांनी २५ डिसेंबर रोजी पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशन मध्ये आम आदमी पार्टीचे अध्यक्ष यांच्या विरूद्ध FIR दाखल केली आहे. आम आदमी पक्षाने आपल्या योजनेच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केली असून लोकांसोबत विश्वासघात केला असल्याने केजरीवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केल्याचे लाकडा यांनी सांगितले.
काँग्रेसने आपल्या शेवतपत्रिकेत आम आदमी पार्टीच्या कारभारावर टीका केली आहे त्यामुळे या दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण झाल्याने काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्यासाठी आप इतर पक्षांशी चर्चा करणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस एकत्र लढले होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आप आणि एकत्र लढले होते परंतु पंजाब राज्यात एकत्र लढण्यावरून दोन्ही पक्षात सहमती होऊ शकली नव्हती. EVMच्या मुद्यावरून सुद्धा इंडिया आघाडीतील पक्षात मतभेद निर्माण झाले होते.