थंडीच्या दिवसात काही भागामध्ये प्रचंड थंडी पडते, अशावेळी रेफ्रीजरेटरचा वापर खूपच कमी केला जातो. म्हणून बरेच लोकं रेफ्रीजरेटर दिवसातून काही तास बंद करून ठेवतात. असे केल्याने ऊर्जेची बचत होते असे मानले जाते. थंडीत फ्रीज बंद ठेवणे काही परिस्थितीत फायदेशीर असू शकते, परंतु त्याचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. फ्रीज थोड्या वेळासाठी बंद ठेवण्याचा तुमचा निर्णय तुमच्या वापरावर, ताज्या अन्नाच्या प्रकारावर, आणि इंटर्नल तापमानावर अवलंबून असते. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर तुमचा खर्च आणखीन वाढू शकतो.