Ambajogai Crime : धक्कादायक.. पोलीस चौकीसमोरच तरुणावर जीवघेणा हल्ला; अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय परिसरातील घटना
Saam TV December 27, 2024 12:45 AM

बीड : बीडच्या अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयातील पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत चौघांनी मिळून चाकू आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. 

च्या सदर बाजारात वास्तव्यास असलेला जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख असे घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदरच्या घटनेत रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास क्रांती नगरातील श्रीहरी दौलत मुंडे हा जमीर शेख यास दारू पिण्यासाठी आग्रह करत होता. मात्र जमीरने दारू पिण्यास नकार देऊन शिवीगाळ केली. याचा राग श्रीहरी यास आला होता. हा राग मनात धरून तो तेथून निघून गेला होता. 

जाब विचारत केला प्राणघातक हल्ला 

मात्र मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जमीर हा स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय समोरील चौकात बसला असताना श्रीहरी मुंडे याने त्यास पोलीस चौकी जवळील एटीएम समोर बोलावले. या ठिकाणी जमीर आला असता त्याला श्रीहरी याने तू मला शिवीगाळ का केली होतीस? असा जाब विचारत जमीरच्या मानेवर चाकूने वार केला. तसेच श्रीहरी याच्यासोबत असलेल्या आर्यन मांदळे व अनोळखी दोघांनी देखील कोयता आणि चाकूने जमीरवर प्राणघातक हल्ला केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

तरुणाची प्रकृती चिंताजनक 

तर घटनेनंतर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जमीरवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान त दिलेल्या फिर्यादीवरून श्रीहरी मुंडे, आर्यन मांदळे व अनोळखी दोघांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, तर ऐन पोलीस चौकीसमोर झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.