जानेवारीत काश्मीरचं गुलमर्ग अधिकच मस्त आणि साहसी खेळांनी परिपूर्ण असतं. हे गेम्स कुठले आहेत? पाहा पुढच्या स्लाईडवर
Activities in Kashmir Skiing and Snowboardingगुलमर्गमध्ये जानेवारीत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि त्यामुळं स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगचा अधिक आनंद घेतला जातो. तुम्ही अफरवत शिखरं तसंच कोंगदोरी इथं स्कीइंग करू शकता. यासाठी जागेवरच तुम्हाला किट आणि इतर उपकरणं भाड्यानं मिळतात.
Activities in Kashmir Sledgingजानेवारीत गुलमर्गमध्ये तुम्हाला बर्फाच्या शिखरावर स्लेडिंगचा आनंद घेता येतो. यासाठी जागेवरच तुम्हाला स्लेज भाड्यानं मिळतात त्याचा वापर करुन तुम्ही स्लेज करू शकता.
Activities in Kashmir Ice Skatingजानेवारीत तयार होणाऱ्या नैसर्गिक रिंकमध्ये आइस स्केटिंगचा आनंद घेता येतो. यासाठी स्केट्स भाड्यानं मिळतात आणि आपण या स्थानिक खेळाचा आनंद घेऊ शकतो.
Activities in Kashmir Gondolaजानेवारीत गोंडोला इथं सहलीला जाणं हा एक आनंददायी अनुभव आहे. याठिकाणी हिमाच्छादित कुरणं, शिखरं आणि जंगलांचा आनंद घेता येतो. तसंच कोंगदोरी शिखर अन् अफरवत शिखरांवर इतर खेळांचा आनंद घेता येतो.
Activities in Kashmir ATV Car Rideगुलमर्गमधील सर्वात साहसी खेळांपैकी एक म्हणजे एटीव्ही चालवणं. एटीव्ही हे वाहन सर्व प्रकारच्या भूप्रदेश चालवता येतं, जे चालवताना तुम्हाला साहसी अनुभव मिळेल.
Activities in Kashmir Clothingजानेवारीत काश्मीरमध्ये फिरण्यासाठी उबदार जॅकेट शक्यतो वॉटरप्रूफ, उबदार जीन्स, वॉटरप्रूफ शूज, जड लोकरीचे स्वेटर, मिटन्स आणि उबदार मोजे यांचा वापर करावा लागतो.
Activities in Kashmir Other Accessoriesबर्फाच्या चकाकीपासून तुमच्या डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला छत्री, स्किन मॉइश्चरायझर, सनग्लासेस सोबत ठेवणं गरजेचं आहे.