मुंबईतील खैराणी रोड साकिनाका परिसरात भीषण आग लागली आहे. या ठिकाणी असलेल्या गोदामाला आग लागली असून आगीत २ गोदामने पेट घेतला आहे. झोपडपट्टी भागात ही आग लागल्याने अग्निशामक दलाला शर्यतीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
Jammu and Kashmir News : रोप-वे प्रकल्पाविरोधात श्री माता वैष्णो देवी संघर्ष समितीकडून ७२ तासांच्या बंदचे आवाहनश्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कत्रा जिल्ह्यातील प्रस्तावित रोप-वे प्रकल्पाविरोधातील आंदोलन सलग तिसऱ्या दिवशी सुरूच होते. आणखी काही स्थानिकांनी उपोषण सुरू केल्याने या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली आहे. या प्रकल्पाच्याविरोधात श्री माता वैष्णो देवी संघर्ष समितीकडून ७२ तासांच्या बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
Bangalore Airport LIVE : बंगळूर विमानतळावर ८० लाखांचा गांजा जप्तबंगळूर : बंगळूरमध्ये विमानतळ सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी आठ किलो उच्च दर्जाच्या हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. बँकॉकहून वेगळ्या फ्लाइटने आलेल्या दोन प्रवाशांकडून सुमारे ८० लाखांचा गांजा त्यांनी जप्त केला. हायड्रोपोनिक गांजा हा प्रयोगशाळेत पाण्यात पोषक द्रव्ये टाकून उगवला जातो. सीमाशुल्क अधिकाऱ्याने सांगितले की, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) तीन आठवड्यांत या प्रकारच्या ड्रग्जची ही दुसरी जप्ती आहे. याप्रकरणी दोघे अनुक्रमे १९ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी थायलंडहून विमानतळाच्या टर्मिनल दोनवर पोहोचले. प्रवाशांच्या प्रोफाईलिंगच्या आधारे त्यांना थांबवण्यात आले. २० दिवसांपूर्वी बँकॉकहून घरी परतत असल्याचे त्यांच्या पासपोर्टवरून स्पष्ट झाले. पर्यटक असल्याचे भासवणाऱ्या आणि काहीतरी तस्करी करू इच्छिणाऱ्यांनी ही पद्धत अवलंबली आहे. दोघेही मध्यमवयीन आणि भारतातीलच रहिवासी आहेत.
Dr. Manmohan Singh Passes Away LIVE : माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्यावर दिल्लीतील राजघाटावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कारLatest Marathi Live Updates 28 December 2024 : माजी पंतप्रधान आणि थोर अर्थशास्त्रज्ञ मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (ता. २६) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील राजघाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदचा मेहुणा आणि बंदी घालण्यात आलेल्या जमात - उद् - दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज अब्दुल रेहमान मक्की याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बेकायदा वाळू उत्खननप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बिहारमध्ये पाटण्यासह अन्य काही शहरांत छापे घातले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथमच रविवारी (ता. २९) कोल्हापुरात येत आहेत. त्यांचे भाजपच्या वतीने कोल्हापूर रेल्वेस्थानक येथे सकाळी स्वागत करण्यात येणार आहे. खानदेशातील तीन जिल्ह्यांना शुक्रवारी बेमोसमी पावसाचा तडाखा बसला. जळगाव शहरासह जिल्ह्यातील यावल, रावेर तालुक्यात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाली. राज्यात आजही ढगाळ वातावरण आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..