बाजरीची इडली रेसिपी
Webdunia Marathi December 28, 2024 02:45 PM

साहित्य-

बाजरीचे पीठ - एक वाटी

रवा - अर्धा कप

तांदळाचे पीठ - अर्धी वाटी

उडीद डाळ - अर्धी वाटी

गाजर - किसलेले

आंबट दही - 1/4 कप

बेकिंग सोडा किंवा एनो - 1 पॅकेट

मीठ चवीनुसार

हिरवी मिरची - तुकडे केलेली

मोहरी - 1 टेबलस्पून

कढीपत्ता - 7 ते 8 पाने

तेल

कृती-

सर्वात आधी एका भांड्यात बाजरीचे पीठ, दही, उडीद डाळ, तांदळाचे पीठ आणि मीठ एकत्र करून घ्या. आता त्यात पाणी घाला आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा. हे पिठ अर्धा तास आंबायला ठेवा. आता त्यात इनो किंवा बेकिंग सोडा घालून पाणी घालून पुन्हा मिक्स करा. इडली स्टँड घ्या, त्यात तेल लावा, तयार मिश्रण घाला आणि वाफ करा. इडली शिजल्यावर ताटात काढून घ्या. आता एक कढईत तेल घालून हिरवी मिरची, मोहरी आणि कढीपत्ता घालून फोडणी बनवून घ्या. आता ही फोडणी तयार इडलीवर घालावी. तर चला तयार आहे आपली बाजरीची इडली, चटणी किंवा सांभार सोबत नक्कीच सर्व्ह करा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.