CIDCO Lottery 2024 Flat Prices and Location: सिडकोच्या वतीने "माझे पसंतीचे सिडको घर" या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ ऑक्टोबर महिन्यात करण्यात आला. या योजनेच्या अंतर्गत 26000 घरे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या लॉटरीसाठी मंगळवारपर्यंत 1 लाख 20 हजार 622 नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने आपली नोंदणी केली आहे. आता अर्ज नोंदणीसाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करु शकणार आहात. पण घरांच्या किमती किती असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचं उत्तर आता सोमवारी मिळणार आहे. कारण, सिडकोच्या वतीने सोमवारी म्हणजेच 30 डिसेंबर रोजी घरांच्या किमती जाहीर करण्यात येणार आहेत.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय संघर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सिडकोने निश्चित केलेल्या घरांच्या किमतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिरवा कंदील मिळाल्यावर सोमवारी (30 डिसेंबर) 26000 घरांच्या किमती जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा :
सिडकोच्या लॉटरीतील घरांच्या किमती निश्चित करण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाने आपला अहवाल सिंघल यांच्याकडे दिला आहे. यामध्ये विविध नोडनुसार, किमती आणि घरांची संख्या, इमारतींची संख्या यांची माहिती आहे.
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईतील विविध नोडमधील 27 ठिकाणी 67 हजार घरांची बांधणी केली जात आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 43 हजार घरांना महारेराची परवानगी प्राप्त झाली आहे. यापैकी 26000 घरांच्या विक्रीसाठी सिडकोकडून नुकतीच लॉटरी जाहीर करण्यात आली. महागृहनिर्माण योजनेतील ही घरे नवी मुंबईतील खारघर, खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसर, मानसरोवर, पनवेल, तळोजा आणि उलवे नोडमध्ये आहेत.
हे पण वाचा :