Latest Marathi News Updates : संजय राठोड होणार पालकमंत्री?
esakal December 29, 2024 10:45 PM
Sanjay Rathod Live: संजय राठोड होणार पालकमंत्री?

मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डाॅक्टर अशोक ऊईके तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक या तिन्ही मंत्र्यांना यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा राजकीयवर्तुळात सुरू असून जिल्ह्यातील जनताही पालकमंत्र्याची आतुरतेने वाट पाहत आहे.सध्या पालकमंत्र्याविनाच जिल्ह्याचा कारभार सुरूय आहेत.

Nana Patole Live: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे.

आज दुपारी २ वा. सुकळी, ता. साकोली जि. भंडारा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.