Latest Marathi News Updates : मस्साजोगमधील जलसमाधी आंदोलनस्थळी पोलिस अधिक्षक पोहचले
esakal January 01, 2025 08:45 PM
Beed Live : मस्साजोगमधील जलसमाधी आंदोलनस्थळी पोलिस अधिक्षक पोहचले

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी 22 दिवसांपासून मोकाट असल्याने गावक-यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनस्थळी तहसीलदारांनंतर आता जिल्हा पोलिस अधिक्षक देखील पोहचले आहेत.

Solapur Live : मैदर्गीजवळ ट्रक आणि स्काॅर्पियोचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू , 8 गंभीर जखमी

नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या नांदेडच्या भाविकांची स्कॉर्पिओ आणि ट्रकचा मैदर्गीजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे.

Live : खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या सीआयडी चौकशीला सुरुवात

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांची सीआयडी कडून चौकशीला सुरुवात..

- वरिष्ठ सी आयडीचे अधिकारी करत आहेत चौकशी.

- खंडणी प्रकरणातील फरार असलेला आरोपी संदर्भात सीआयडी कडून विचारणा..

- आज दिवसभर सीआयडी कडून होणार चौकशी. कोण कोणते विषय उलगडणार हे पाहणं महत्त्वाचं..

Live : कोरेगाव भीमा परिसरात सीसीटिव्ही ची करडी नजर

कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभावर आज २०७ वा शौर्यदिन साजरा होतोय या निमित्ताने लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगाव भिमात दाखल होत असुन चोरीच्या घटना टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे नगर मार्गासह विजयस्तंभ परिसरात सीसीटिव्ही कँमेराच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जातेय चोरी,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस अलर्टमोडवर आहे

Live : मस्साजोगमध्ये ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन; देशमुख हत्याकांडातील आरोपींच्या अटकेची मागणी

मस्साजोगमध्ये ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन

संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींच्या अटकेची मागणी

Live : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुलेवर

बीड : सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुले वर

सुदर्शन घुले हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी

खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपीच्या CID मुसक्या आवळणार

सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत.

वाल्मीक कराडच्या नंतर तपास यंत्रणांचा फोकस तीन फरार आरोपीवर

Live : भांडुपमध्ये जंगल-मंगल रोडवरील दूध केंद्राला आग

भांडुप जंगल मंगल रोड वरील दूध केंद्राला आग

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती

महाराष्ट्र शासनानं आज काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले. तर, काही अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सचिनद्र प्रताप सिंह यांची आयुक्त,शिक्षण पुणे येथे नियुक्ती करण्यात आलीय. रुचेश जयवंशी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ते सध्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियान,  येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणन  कार्यरत होते. त्यांना अल्पसंख्यांक विभास विभाग, मंत्रालय मुंबईचे सचिव  पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. 

Koregaon Live: कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज

पुण्यातील कोरेगाव भीमा येथे आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जाणार आहे. शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवार 31 डिसेंबर व बुधवार 1 जानेवारी असे दोन दिवस होणार१या या सोहळ्यसाठी यंदा लाखोंची उपस्थिती राहणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. यावर्षी कोरेगाव भीमा सभेसाठी पाच हजार पोलीस कर्मचारी,सातशे पन्नास पोलिस आधिकारी  तैनात असणार आहेत. यासोबतच एक हजार होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करणार.

Shaurya Din Bhima Koregaon LIVE : कोल्हापुरात भीमा कोरेगावमधील हुतात्म्यांना अभिवादन

कोल्हापूर : भीमा कोरेगाव येथील युद्धात अनेकांनी आपल्या जीवाची आहुती दिली. त्या हुतात्म्यांना फुले, शाहू, आंबेडकर चळवळीच्या वतीने आज बिंदू चौक येथे निवृत्त पोलिस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ व तानाजी नलवडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मानवंदना देण्यात आली. कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक लढाईतील जवानांचे वंशज सुभाष इनामदार यांच्या हस्ते बिंदू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून व २०७ मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.

LPG Price : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा; एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात

LPG Gas Cylinder New Rate : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक जानेवारी रोहित व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. एलपीजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये 14.50 रुपयांची घट झाली आहे. 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १४.५० रूपये कपात करण्यात आली आहे. तर, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Ayodhya, Uttar Pradesh LIVE : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

अयोध्येत 2025 च्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविक श्री रामजन्मभूमी मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.

PM Narendra Modi LIVE : नवीन वर्ष 2025 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले, 'हे वर्ष प्रत्येकासाठी...'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्ष 2025 निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. "हे वर्ष प्रत्येकासाठी नवीन संधी, यश आणि आनंद घेऊन येवो. प्रत्येकाला उत्कृष्ट आरोग्य आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळो, असं पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं आहे.

Valmik Karad LIVE : वाल्मीक कराडला 14 जानेवारीपर्यंत 'सीआयडी' कोठडी

केज : वाल्मीक कराड याला येथील सत्र न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत ‘सीआयडी’ कोठडी सुनावली. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारी असलेला कराड २१ दिवसांनी पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात मंगळवारी शरण आला. त्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई करून रात्री दहाच्या सुमारास केज पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाणे परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी ती पांगवली. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात होता. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयात आणण्यात आले. न्यायाधीश एस. वाय. पावसकर यांच्यासमोर सुनावणी झाली. ‘सीआयडी’चे वकील ॲड. जे. बी. शिंदे यांनी बाजू मांडली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी खंडणी प्रकरणाचा संबंध आहे. त्याच्या तपासासाठी कराडला पंधरा दिवसांची कोठडी देण्याची मागणी शिंदे यांनी केली. कराड याच्याकडून ॲड. अशोक कवडे यांनी बाजू मांडली. दरम्यान, सरकारी वकील ॲड. देशपांडे यांनी वैयक्तिक कारण देत ऐनवेळी या प्रकरणाच्या सुनवणीतून माघार घेतली. त्यामुळे ॲड. शिंदे यांनी बाजू मांडली.

Adv. Prakash Ambedkar LIVE : कोरेगाव भीमा येथे अॅड. प्रकाश आंबेडकरांनी केलं शौर्य स्तंभाला अभिवादन

कोरेगाव भीमा येथे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शौर्य स्तंभाला अभिवादन केले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक जानेवारी रोजी अभिवादनासाठी मी आलो आहे. सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. अभिवादन करण्यासाठी आजही जनता येत असते, ही गोष्ट चांगली आहे. सरकार आपल्या परीने सुविधा पुरवत असते, पण या अपुऱ्या पडत आहेत. पुढच्या वेळी या सुविधा पुरवल्या जातील अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

Minister Bharat Gogawale LIVE : मंत्री भरत गोगावले कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

Latest Marathi Live Updates 1 January 2025 : कोरगाव भीमा येथे आज शोर्य दिन साजरा होत आहे. ‘झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे, जीवनगाणे गातच जावे...’ असे आनंदगीत गात मंगळवारी रात्री नागरिकांनी जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. तसेच बीड जिल्ह्यातील केज पोलिस ठाण्यात दाखल दोन कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्यात काही दिवसांपासून फरार असलेला वाल्मीक कराड अखेर राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) पुण्यातील मुख्यालयात मंगळवारी दुपारी हजर झाला. त्याला केज येथे नेत न्यायालयात हजर करण्यात आले. राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांचे मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात आगमन झाले. आज ते करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. तसेच राज्यात काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.