बँक सुट्ट्या: नवीन वर्ष 2025 सुरु होण्यास दोन दिवस बाकी आहेत. दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर कोणी बँकांचे व्यवहार करणार असतील तर त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण जानेवारी 2025 मध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकांना या सुट्ट्या विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक सणांमुळे देण्यात आल्या आहेत. तुम्हाला जर नवीन वर्षात बँकांचे व्यवहार करायचे असतील तर दिलेली ही यादी तपासा.
1 जानेवारी 2025: बुधवारी नवीन वर्षाच्या दिवशी देशभरात बँका बंद राहतील.
6 जानेवारी 2025: सोमवारी, गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त पंजाबसह काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
11 जानेवारी 2025: दुसरा शनिवार, देशभरातील बँका बंद राहतील.
12 जानेवारी 2025: रविवारी साप्ताहिक सुट्टी.
13 जानेवारी 2025: लोहरी सणानिमित्त पंजाब आणि इतर काही राज्यांमध्ये सोमवारी बँका बंद राहतील.
14 जानेवारी 2025: तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये मंगळवारी संक्रांती आणि पोंगलमुळे बँका बंद राहतील.
15 जानेवारी 2025: बुधवारी, तिरुवल्लुवर दिनानिमित्त तुसू पुजेमुळे तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बँक सुट्टी असेल.
23 जानेवारी 2025: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी अनेक राज्यांमध्ये बँका सुरू राहणार नाहीत.
25 जानेवारी 2025: साप्ताहिक सुट्टीमुळे शनिवारी देशभरात बँका बंद राहतील.
26 जानेवारी 2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी देशभरात बँकांना सुट्टी असेल.
30 जानेवारी 2025: सोनम लोसारमुळे सिक्कीममध्ये गुरुवारी बँका बंद राहतील.
31 जानेवारी 2025- मी-डॅम-मी-फीमुळे आसाममध्ये सुट्टी
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. जर तुम्ही पुढील जानेवारी महिन्यात बँकिंगशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करणार असाल, तर तुम्हाला पुढील वर्षी जानेवारी महिन्यात येणाऱ्या बँक सुट्ट्यांची माहिती घ्यावी. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात नवीन वर्ष, गुरु गोविंद सिंग जयंती, मकर संक्रांती, विवेकानंद जयंती, प्रजासत्ताक दिन इत्यादी अनेक महत्त्वाच्या प्रसंग येत आहेत. या विशेष प्रसंगी बँका बंद राहतील. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील? जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्हाला बँकिंगशी संबंधित काम पूर्ण करण्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तथापि, आजच्या डिजिटल युगात, तुम्ही सुट्टीच्या दिवशीही बँकिंगशी संबंधित अनेक कामे ऑनलाइन करू शकता.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..