Anjeer : अंजीरमध्ये भरपूर फायबर, पॉलिफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि फायबर हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. अंजीरमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. तसेच अंजीरमध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करण्याचे काम करते. अंजीरपासून मिळणारे एकदंरीत फायदे लक्षात घेता अंजीराचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो.
ड्रायफ्रूटसच्या यादीतल्या या बहुगुणी अंजीरपासून तुम्ही अंजीरचा शिरा देखील बनवू शकता. याचा तुमच्या आरोग्याला फायदा होण्यासोबतच स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद देखील तुम्ही घेऊ शकता. हा हलवा बनवणे अगदी सोपे आहे, केवळ त्याची तयारी करण्यासाठी तुम्हाला अंजीर 5-6 तास पाण्यात किंवा रात्रभर भिजत ठेवावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया अंजीर हलवा बनवण्याची रेसिपी.
हे देखील वाचा:
पौष्टिक आणि स्वादिष्ट अंजीर हलवा रेसिपी बनवण्याची पद्धत
अंजीर हलवा हा एक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट गोड पदार्थ आहे. अंजीर मध्ये प्रथिने, फायबर्स, आणि विविध व्हिटॅमिन्स असतात, जे शरीरासाठी चांगले असतात.
साहित्य:
भिजवलेले अंजीर – 10 ते 12
दूध – 2 कप
गूळ पावडर– 1/2 कप (चवीनुसार कमी किंवा जास्त करु शकता)
घी – 2 टेबलस्पून
वेलची पावडर – 1/2 चमचे
काजू, बदाम, पिस्ता –1/4 कप (कापलेले)
हे देखील वाचा:
कृती
पाण्यात भिजवलेले अंजीर बाहेर काढून घ्या, ते स्वच्छ धुवून घेत त्याचे बारीक तुकडे कापून घ्या. अंजीर भिजवलेले पाणी फेकून देऊ नका, पुढील वापरासाठी बाजूला ठेवा.
आता तवा मंद आचेवर ठेवा आणि त्यात तूप गरम करा. नंतर त्यात वेलची आणि दालचिनीची काडी टाकून एक मिनिट परतून घ्या. आता त्यात चिरलेले अंजीर घालून 5 मिनिटे शिजवा. यानंतर, त्यामध्ये बाजूला ठेवलेले अंजीरचे पाणी घाला.
कढईमध्ये पाणी टाकल्यावर मिश्रण चांगले ढवळून घ्या, किमान 2 ते 3 मिनिटे शिजवा. आता या मिश्रणात गूळ पावडर घाला आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटे शिजवा. गूळ मिश्रणात पूर्णपणे मुरू द्या.
गूळ विरघळल्यानंतर या मिश्रणात दूध घाला, त्यानंतर ढवळत रहा.
हलवा घट्ट होऊ लागल्यावर 1 टेबलस्पून तूप घाला. नंतर काजू, बदाम, पिस्ता आणि किशमिश घालून 5 मिनिटे मध्यम आचेवर हलवून ठेवू द्या. अशाप्रकारे अंजिरचा हलवा बनवून तयार आहे. लगेच गरमागरम सर्व्ह करा
अंजीर हलवा फ्रिजमध्ये 2 ते 3 दिवस देखील तुम्ही ठेवू शकता. न्यू इयर पार्टी तसेच विशेष समारंभासाठी एक गोड मिठाई म्हणून देखील हा हलवा बनवता येऊ शकतो.