Pregnancy Care Tips : प्रेग्नन्सीमध्ये या कॉस्मेटीकपासून राहावे दूर
Marathi January 01, 2025 09:25 PM
प्रेग्नन्सीचा काळ कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात बदल आणणारा असतो. या अवस्थेत अनेक शारीरिक आणि मानसिक बदलाव होत असतात. या दिवसात स्त्रीला आहार, राहणीमान, दिवसाचे रूटीन या सर्वच गोष्टींची काळजी घेण्यास सांगितले जाते. यासोबत आणखी एका विशेष गोष्टीपासून दूर राहण्याचा सल्ला तज्ञ देतात, ते म्हणजे कॉस्मेटीक. प्रेग्नन्सीमध्ये काही कॉस्मेटीक बाळासह आईसाठी हानिकारक मानली जातात. जाणून घेऊयात, प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या कॉस्मेटीकपासून दूर राहावे.
शॅम्पू –
- केसांचे आरोग्य राखण्यासाठी आणि केस मऊ, स्वच्छ करण्यासाठी शॅम्पूचा वापर केला जातो.
- शॅम्पूमध्ये विविध केमिकल्स असतात, ज्याच्या बाळाच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये शॅम्पू वापरण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
डिओ –
- घामाच्या दुर्गंधापासून लांब राहण्यासाठी डियोचा वापर करण्यात येतो. पण, प्रेग्नन्सीमध्ये डियो वापरण्यास मनाई करण्यात आले आहे.
परफ्यूम –
- डियोप्रमाणेच परफ्यूम प्रेग्नन्सीमध्ये वापरू नये. परफ्यूम तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या केमिकल्सचा वापर करण्यात येतो.
- परफ्यूममधील हानिकारक केमिकल बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
केसांचा रंग –
- पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर कलरचा वापर केला जातो. पण, प्रेग्नन्सीमध्ये चुकूनही हेअर कलर केसांसाठी वापरू नये.
- डिलिव्हरीनंतर तुम्ही केसांना कलर करू शकता.
लिपस्टिक
- लिपस्टिक सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये वापरू नये. प्रेग्नन्सीमध्ये लिपस्टिक न वापरण्याचे कारण म्हणजे यामध्ये लेड असते. जे चहा-कॉफीच्या माध्यमातून शरीरात जाऊ शकते.
कोणते केमिकल कशात वापरण्यात येतात –
- सोडियम लॉरील सल्फेट – शाम्पू, बॉडी वॉश, फाउंडेशन, फेसवॉश, माउथवॉश
- ट्रिक्लोसन – टूथपेस्ट, डिओडरंट, ऍटीबॅक्टेरियल साबण
- अमीमोफीमोल – हेयर ड्राय, शॅम्पू
- पॅराबेन्स – मॉइश्चरायझर्स, शेव्हिंग क्रीम, स्प्रे
- पॉलिथिलीन – बॉडी वॉश, स्क्रब, टूथपेस्ट
- रेटिनोइक – लिप बाम, सनस्क्रीन
- पेट्रोलियम डिस्टिलेट्स – मस्करा
- ऑक्सिबेन्झोन – सनस्क्रीन
- फॉर्मल्डिहाइड – नेल पॉलिश
हेही पाहा –
संपादन – चैताली शिंदे