Mahesh Gaikwad : भाजपचा आरोपींना पाठबळ; महेश गायकवाड यांचा आरोप
Saam TV December 30, 2024 12:45 AM

अभिजित देशमुख 
कल्याण
: खोटे आरोप करत विशाल गवळी आणि त्याचे कुटूंब भाजपशी संबंधित असल्याचे नाकारता येत नाही. खोटेनाटे आरोप करून तुम्हाला तुमचं पाप लपवता येणार नाही. वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त केली. त्याप्रमाणे माझ्यावर हल्ला झाला, तेव्हा आमदार गणपत गायकवाड त्यांचा मुलगा व फरार आरोपींची संपत्ती का जप्त केली नाही? त्यांना साधी अटक देखील केली नाही. भाजपचे आरोपीना पाठबळ आहे; असा आरोप महेश गायकवाड यांनी भाजपवर निशाणा साधत केला आहे.

पूर्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला विशाल गवळी हा कुणाचा कार्यकर्ता या मुद्द्यावरून कल्याण पूर्वेतील राजकीय वातावरण तापले आहे. तर यांनी विशाल हा भाजपचा कार्यकर्ता असल्याने भाजप त्याला पाठीशी घालत आहे; असा संशय व्यक्त केला. महेश गायकवाड यांच्यावर भाजपने पलटवार करताना विशाल गवळीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ असलेली पोस्ट दाखवली. यामध्ये राजकारण आणू नये असा टोला लगावला.

त्या भाजप कार्यकर्त्याला अटक करा 

या मुद्द्यावरून महेश गायकवाड पुन्हा आक्रमक झाले आहेत. यावर आज महेश गायकवाड यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात एसीपीची भेट घेतली. यावेळी महेश गायकवाड यांनी भाजप पदाधिकाऱ्यांनी काल विशाल गवळीची जी पोस्ट दाखवली ते खोटी आहे. याबाबत खोटं अकाउंट बनवून माझा फोटो अपलोड करण्यात आला असल्याचे सांगितले. तर या प्रकरणी पोलीस ठाण्यात संबंधीत पदाधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी केली आहे. 

विशाल गवळी कुणाचा कार्यकर्ता

कल्याण पूर्वेत मुलीच्या अत्याचार प्रकरणातील नराधम विशाल गवळी कुणाचा कार्यकर्ता आहे; यावरून महेश गायकवाड आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून चांगलीच जुंपली आहे. त्यातच उज्वल निकम यांना या प्रकरणात वकील म्हणून नेमणूक करू नका अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. खोटं अकाउंट बनवून माझ्या नावाने पोस्ट करत माझी बदनामी केली. याबाबत चौकशी करून बदनामी करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यावर कारवाई करा; अशी मागणी महेश गायकवाड यांनी पोलिसांकडे केली. जोपर्यंत नराधम विशाल गवळीला फाशी होत नाही तोपर्यंत आंदोलन उग्र होत जाईल असा इशारा दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.