आणखी एक Airport तयार! नवी मुंबई विमानतळ आकाशात 'अधिराज्य' गाजवण्यास सज्ज, पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग
esakal December 30, 2024 01:45 AM

देशात आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाले आहे. मुंबई येथे बांधण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान यशस्वीरित्या उतरले आहे. ही चाचणी सर्व मानकांमध्ये उत्तीर्ण झाली आहे. या चाचणीनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच उड्डाणे सुरू होऊ शकतात.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील या चाचणीदरम्यान, इंडिगो एअरलाइन्सचे A320 विमान यशस्वीरीत्या उतरले. यादरम्यान विमानाल वॉटर कॅननची सलामीही देण्यात आली. इंडिगो एअरलाइन्सचे A320 विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे 08/26 वर यशस्वीरित्या उतरले. विमानतळाच्या पूर्ण कार्यात मैलाचा दगड ठरला. हा संस्मरणीय क्षण साजरा करण्यासाठी, NMIA च्या दोन Crash Fire Tenders (CFT) ने देखील वॉटर सॅल्यूट देऊन विमानाचे स्वागत केले.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA), भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), सीमाशुल्क, इमिग्रेशन, CISF, CIDCO, IMD, BCAS तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) चे वरिष्ठ अधिकारी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हा महत्त्वाचा दिवस असल्याचे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचे सीईओ अरुण बन्सल यांनी यावेळी सांगितले.

प्रमाणीकरण उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण करणे हा एक मैलाचा दगड आहे आणि आम्ही आता प्रत्येक टप्प्यावर सुरक्षिततेला प्राधान्य देऊन विमानतळ कार्यान्वित करण्याच्या एक पाऊल जवळ आलो आहोत. व्हॅलिडेशन फ्लाइट चाचणी यशस्वी करण्यासाठी आम्ही DGCA आणि सर्व एजन्सींचे आभारी आहोत. NMIA केवळ जागतिक दर्जाच्या विमान वाहतूक सुविधाच पुरवणार नाही, तर या क्षेत्राचा सर्वांगीण विकास देखील करेल.

अरुण बन्सल म्हणाले की, NMIA चा टर्मिनल-1 दोन कोटी प्रवाशांना हाताळण्यास सक्षम आहे, 3 कोटी प्रवाशांना हाताळू शकणाऱ्या टर्मिनल-2 वर काम सुरू झाले आहे. 2028-29 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस विमानतळ कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे. या विमानतळावर पहिल्या दिवसापासून सर्व आधुनिक सुविधा असतील. टर्मिनल-1 दोन कोटी प्रवाशांना हाताळू शकतो. NMIA येथे टर्मिनल-2 चे काम सुरू झाले आहे. या टर्मिनल-2 मध्ये तीन कोटी प्रवाशांची अतिरिक्त क्षमता असेल. आर्थिक वर्ष 2028-29 च्या अखेरीस ते कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांना मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचे कामकाज विभाजित करता येणार आहे. उड्डाणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विमान कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.