लडाखमध्ये उभारला शिवरायांचा भव्य पुतळा
esakal December 30, 2024 01:45 AM
Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh भारतीय सैन्य

भारतीय सैन्य दलाने पूर्व लडाखमधील पँगाँग तलावाच्या काठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh पुतळा

हा पुतळा समुद्रसपाटीपासून तब्बल 14,300 फूट उंचीवर उभारण्यात आला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh मराठा साम्राज्य

पुतळ्याच्या शेजारी मराठा साम्राज्याचा ध्वज फडकताना दिसतो.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh भारत-चीन

हा भाग भारत-चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेजवळ असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh शौर्य

भारतीय सैन्याच्या म्हणण्यानुसार, शिवाजी महाराजांचा हा पुतळा शौर्य, दूरदृष्टी आणि अटळ न्यायाचे प्रतीक आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh हितेश भल्ला

14 व्या कोरचे लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांनी या पुतळ्याचे अनावरण केले.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh व्हिडिओ

सोशल मीडियावर या अनावरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले दिसतात.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh झेंडा

त्यांच्या हातात तलवार आहे आणि मागे मराठा साम्राज्याचा झेंडा फडकतो आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh जवान

या कार्यक्रमासाठी सैन्याचे अनेक अधिकारी आणि जवान उपस्थित होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh प्रेरणादायी

हा पुतळा उभारण्यामागे शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी वारशाचे स्मरण करण्याचा उद्देश आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh शांतता

पुतळ्याच्या अनावरणाची वेळ भारत-चीन टकरावानंतरच्या शांतता प्रक्रियेशी जुळलेली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh पँगाँग

भारत आणि चीनने 2021 मध्ये पँगाँग तलावाच्या भागातून सैन्य माघारी घेतल्याचे जाहीर केले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh LAC

पँगाँग तलाव भारत आणि चीनमधील LACच्या मधोमध आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh तिबेट

तलावाचा पश्चिम भाग भारताच्या हद्दीत, तर पूर्व भाग चीनच्या तिबेट क्षेत्रात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Ladakh लडाख

शिवाजी महाराजांचा पुतळा लडाखमध्ये उभारल्याने मराठा साम्राज्याचा शौर्यपूर्ण इतिहास पुन्हा एकदा उजळला आहे.

kulkarni right payment Chhatrapati Shivaji Maharaj तूप अन् घुगरी..! शिवरायांच्या काळात कुलकर्ण्यांचा पगार किती असायचा?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.