Latest Marathi News Updates : वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता, सीआयडीने फास आवळला
esakal December 30, 2024 02:45 AM
वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता, सीआयडीने फास आवळला

सीआयडीकडून संतोष देशमुख प्रकरणी तपासाला वेग आला असून वाल्मिक कराडसह चारही आरोपींचा फास आवळण्यात आला आहे. आरोपींच्या गाडीत दोन मोबाईल हाती लागले असून त्यातून महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. वाल्मिक कराडसह चौघांची खाती गोठवण्यात आली आहेत. यामुळे आता वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

बिहारमध्ये BPSC परीक्षा पुन्हा घेण्यासाठी विद्यार्थी आक्रमक

बिहारमध्ये BPSC परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी करत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखल्यानंतर मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी पाण्याचा फवारा मारून त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला.

बोईसर तारापूर MIDCमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

बोइसर तारापूर एमआयडीसीत भीषण आग लागल्याची घटना घडलीय. एका कंपनीत भडकलेल्या आगीनंतर धुराचे लोट आकाशात पसरले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Mumbai News: मुंबईच्या जुहू परिसरात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी

मुंबईच्या जुहू परिसरात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी,

बिग बी अमिताभ बच्चन दर रविवारी संध्याकाळी पाच वाजता आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर येतात. अमिताभ बच्चन आज संध्याकाळी चाहत्यांना भेटण्यासाठी जालसा बंगल्या बाहेर आल्यावर चाहत्यांची प्रचंड मोठी गर्दी झाली.

2024 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी मारले गेलेले 60 टक्के दहशतवादी पाकिस्तानी

2024 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी मारले गेलेले 60 टक्के दहशतवादी पाकिस्तानी आहेत.

Nitish Kumar Live: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांच्या निवासस्थानावरून निघाले

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांच्या निवासस्थानावरून निघाले आहेत.

Accident News: राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर उलटला

राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा नजीक एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर रविवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास उलटल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी टँकरवर अग्निशमन दलाच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात आला.

राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने तिरुवल्लूरमधील मच्छिमारांना उद्या श्रीहरिकोटा येथून SLV-C60 रॉकेट प्रक्षेपण करण्यापूर्वी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला

राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने तिरुवल्लूरमधील मच्छिमारांना उद्या श्रीहरिकोटा येथून SLV-C60 रॉकेट प्रक्षेपण करण्यापूर्वी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

Palghar News: मातामृत्यू प्रकरणाची समिती मार्फत चौकशी करावी

मोखाडा तालुक्यातील कोलध्याचा पाडा येथील आशा भुसारा या मातेचा प्रसूती नंतर मृत्यू झाला आहे. तिला मोखाडा, जव्हार आणि नाशिक असा प्रवास, ऊपचारासाठी करावा लागला होता. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने आशा चा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Satish Pradhan Passed Away: ठाण्याचे पहिले महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं निधन

ठाण्याचे पहिले महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं निधन झालं आहे.

Mumbai Live: मढ कोळी वाड्यातील तिसाई बोटीला मालवाहू जहाजाची जोरदार धडक

मढ कोळी वाड्याजवळ रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मालवाहू जहाजाने तिसाई नावाच्या मासेमारी बोटीला जोरदार धडक दिली. या धडकेत मासेमारी करणारी बोट पूर्णपणे बुडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बोटीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे स्थानिक मासेमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित जहाजाविरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Mumbai News live : ओशिवरामध्ये तरुणांकडून कुत्र्यावर गोळीबार

ओशिवरा येथील शांतीवन सोसायटीत तरुणांकडून कुत्र्यावर गोळीबार

एअरगन च्या माध्यमातून तरुणाने कुत्र्यावर केला गोळीबार

काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराची घटना

एअरगनची गोळी कुत्र्याच्या शरीरातून झाली आरपार

गोळी आरपार गेल्यामुळे कुत्रा गंभीर जखमी

गंभीर जखमी कुत्र्याला प्राणी रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल

Mumbai Live : नवी मुंबई एअरपोर्टवर १७ एप्रिलपासून सुरु होणार प्रवासी आणि कार्गो विमान सेवा

१७ एप्रिल २०२५ मध्ये पहिले प्रवासी आणि कार्गो विमान सेवा सुरू होईल

युध्दपातळीवर काम सुरू आहे.. सर्व परवानग्या मार्च पर्यंत मिळतील.

Commercial इंडिगो विमानाचे आज स्वागत केले जाईल.

उदघाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहण्याची शक्यता.

सर्व कामे पूर्ण झालीत ओरत्येक टप्पा आम्ही enjoy करतोय

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे सीईओ बी व्ही जे के शर्मा यांनी ही माहिती दिली

Pune Live : रूपाली ठोंबरे आपल्या दाव्यावर ठाम

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोर्चाबाबत जितेंद्र यांचे कथित व्हॉट्सॲप चॅट व्हायरल झाले होते. तसेच हे व्हॉट्सॲप चॅट त्यांचेच असल्याचा दावा रुपाली ठोंबरे यांनी केल्यावर ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण रुपाली ठोंबर गुन्हा दाखल झाल्यावरही आपल्या दाव्यावर ठाम आहेत.

PM Modi Live : कुंभमेळ्यात पहिल्यांदाच होणार AI चॅटबॉटचा वापर

कुंभमेळ्यात पहिल्यांदाच एआय चॅटबॉटचा वापर केला जाणार आहे, याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये माहिती दिली.

Beed Live : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विधान भोवले, रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड यांचा खोटा वाॅटसॲप चॅटचा स्क्रीनशाॅट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल केला. यामध्ये रुपाली ठोंबरेसह काही लोकांची नावे आहेत.

Aalandi Live: इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ

गेल्या आठवड्याभरापासून पाण्यातील प्रदूषण वाढू लागलंय. लोणावळ्यापासून उगम पावलेल्या या नदीत रसायनयुक्त आणि मैलामिश्रित पाणी सोडलं जातंय. परिणामी आळंदीत हे असे चित्र गेल्या आठ वर्षांपासून पहायला मिळतंय. सरकार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आलंय.

Beed Live: अंजली दमानिया यांना बीड पोलिसांची नोटीस

बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. आता अंजली दमानिया यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. 

Entertainment Live: कुकिंग करताना अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा हात जळाला

सध्या सेलिब्रिटी मास्टरशेफ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील मोठे चेहरे वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करतात. मात्र याच कार्यक्रमात भाग घेतलेला असताना अभिनेत्री तेजस्वी प्रकाश जखमी झाली आहे. खाद्यपदार्थ तयार करत असताना तिचा हात जळला आहे. 

Akkalkot Live: नाताळच्या सुट्ट्यांमुळे अक्कलकोट येथे भाविकांच्या रांगा

नाताळ सणाच्या सुट्ट्या व सलग सुट्ट्या यामुळे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. शहरातील देवस्थाने व वटवृक्ष मंदिरात भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या पाठीपासून लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

Nagpur Murder: छातीवर वार करून धावत्या ऑटोतून फेकून देत हत्या

छातीवर वार करून धावत्या ऑटोतून फेकून देत हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय....

मारेकरी मृतकाची ओळख जून पटली नसून हत्येचा गुन्हा दखल, धंतोली पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू

आरोपींनी ऑटो रिक्षातून कुंभार टोली परिसरात सुरवातीला चाकूने वार करून जखमी केले, त्यानंतर चालत्या ऑटोतून धक्का देऊन जखमीला फेकत पसार झाले...जखमीचा रक्तस्राव होऊन मृत्यू झाला...

मृतक हा 40 ते 45 वर्षाचा आहे. यात ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडलीय... मृताच्या खिशात पोलिसांना लोहगाव ते वाघोली असे प्रवासाचे तिकीट मिळाले....त्यावरून पुण्याचा रहिवासी असल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केलाय...

पोलीस आरोपींचा शोध घेत हत्येमागचे कारण शोधत आरोपीचा शोध लावत आहे...

Paithan Live : भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला माल!

पैठण तालुक्यातील पाचोडच्या आठवडे बाजारात भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिला .

Pune Live: रायगडावरील श्री जगदीश्वर व श्री वाडेश्वर ही दोन वेगळी मंदिरे

रायगडावर असलेल्या महादेव मंदिरांचा अभ्यास करताना दोन स्वतंत्र मंदिरांचा पुरावा समोर आला आहे. इतिहास संशोधक राज मेमाणे यांच्या संशोधनातून श्री जगदीश्वर आणि श्री वाडेश्वर महादेव ही दोन वेगवेगळी मंदिरे असल्याचे समोर आले आहे.

भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या पाक्षिक सभेत राम मेमाणे यांनी त्यांचे संशोधन सादर केले. यावेळी ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडूरंग बलकवडे, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, उपाध्यक्ष डॉ. बी.डी. कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार निकम यावेळी उपस्थित होते.

राज मेमाणे म्हणाले, रायगडावरील महादेवाचे मंदिर त्याच्या तटबंदीवर असलेल्या शिलालेखातील मजकुरावरून श्री जगदीश्वर महादेव या नावाने ओळखले जाते. पुणे पुरालेखागारातील पेशवेकालीन मोडी कागदपत्रांतून रायगडावर श्री वाडेश्वर महादेवाचे जीर्ण झालेले मंदिर होते आणि त्याचा जीर्णोद्धार इसवी सन १७८२ साली केला असा उल्लेख येतो. त्यावरून ज्येष्ठ इतिहास संशोधक श.ना. जोशी यांनी त्यावेळेस उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतील मजकुरावरून असा तर्क मांडला होता कि, रायगडावरील महादेवाचे शिवकालीन मूळ नाव वाडेश्वर असावे आणि प्रस्तुत शिलालेखात गौरवार्थ म्हणून काव्यात त्याला जगदीश्वर म्हटले गेले असावे.

Pune: विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलीस महासंचालकांनी घेतला बंदोबस्ताचा आढावा

पुण्यातील कोरेगाव भिमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतला बंदोबस्ताचा आढावा

भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे आयोजन

पुणे पोलीस आयुक्तालय येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

सुरक्षा यासह कोरेगाव भिमा येथे येणाऱ्या नागरिकांची पार्किंग व्यवस्था, इतर सोयी सुविधांचा सुद्धा यावेळी आढावा घेण्यात आला

Pune Live: पुण्यात भिंतीवर लावलेल्या रंगावरून वाद?

पुण्यात भिंतीवर लावलेल्या रंगावरून वाद?

पुण्यात एका भिंतीवर हिरवा रंग देत चादर आणि फुलं चढवल्याचा प्रकार

पुणे शहरातील सदाशिव पेठेत हा प्रकार समोर

या घटनेची भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली दखल

पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले असल्याचा मेधा कुलकर्णी यांनी केला आरोप

आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया, भाजप खासदार यांचे आवाहन

मेधा कुलकर्णी यांची सोशल मीडिया पोस्ट

काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे व्हाट्सअप viral झाले. मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी गेले. आधी खात्री करून घेतली आणि मग श्री संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि श्री. दातेरे यांच्या समवेत हिरवा रंगावर भगवा रंग असा चढवला की मजा आली.

Pune: पुण्यात CNG दरांमध्ये पुन्हा वाढ

पुण्यात CNG दरांमध्ये पुन्हा वाढ

एमएनजीएलकडून रुपये 1.10 प्रति किलो सीएनजी दरवाढ

पुण्यातील CNG च्या दरात रुपये १.१० प्रति किलोची वाढ

ही दरवाढ जागतिक बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम असल्याचे सांगितले जातं आहे

सी एन जी साठी आता नवीन किंमत ८९ रुपये प्रति किलो इतकी राहणार

सी एन जी जुनी किंमत ८७.९० प्रति किलो इटली होती

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात सीएनजीचे नवीन दर ८९ रुपये प्रतिकिलोवर

Sanjay Rathod Live: संजय राठोड होणार पालकमंत्री?

मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डाॅक्टर अशोक ऊईके तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक या तिन्ही मंत्र्यांना यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा राजकीयवर्तुळात सुरू असून जिल्ह्यातील जनताही पालकमंत्र्याची आतुरतेने वाट पाहत आहे.सध्या पालकमंत्र्याविनाच जिल्ह्याचा कारभार सुरूय आहेत.

Nana Patole Live: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे.

आज दुपारी २ वा. सुकळी, ता. साकोली जि. भंडारा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.