आनंदाची बातमी! मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ असा जोडणार, जाणून घ्या नेमका प्लॅन
NIA Connectivity Update : नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी रस्ते, जलमार्ग आणि हवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. अशातच नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे की, मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.
वर्षाला एवढे कोटी प्रवासी करणार विमानतळाचा वापरनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांशी मेट्रोने जोडले जाणार आहे. मुंबईतील समुद्र आणि खाड्यांचा वापर करून जलमार्गाने विमानतळ जोडण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. यामुळे अंदाज लावण्यात आले आहे की, या विमानतळाचा वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी वापर करतील.
चार टर्मिनल एकमेकांशी जोडले जाणारसध्या मुंबई विमानतळावर एक रनवे आहे, परंतु नवी मुंबई विमानतळावर दोन रनवे असतील, ज्यामुळे तिथे दुप्पट क्षमता असेल. विमानतळावर चार टर्मिनल असतील, आणि हे चार टर्मिनल एकमेकांशी जोडले जातील. यामुळे, कोणत्याही टर्मिनलमधून प्रवाशी इच्छित ठिकाणी सहजपणे पोहोचू शकतील. सध्या, मुंबई विमानतळावर प्रवाशांना खाजगी वाहतुकीने दुसऱ्या टर्मिनलवर जावे लागते, परंतु भविष्यात ही समस्या दूर होईल.
नवी मुंबई विमानतळावर पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंगनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग नुकतेच पार पडले. यावेळी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आणि जल्लोष करत आनंद व्यक्त केला. या ऐतिहासिक क्षणी, अग्निशमन दलाने पहिल्या विमानास वॉटर सलामी दिली.
मार्च 2025 मध्ये व्यावसायिक उड्डाणांसाठी होणार सुरूत्यामुळे, नवी मुंबईसह मुंबईकरांना या विमानसेवेचा एक वेगळाच आनंद मिळाला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत हा विमानतळ उभारला जात आहे, आणि हा विमानतळ मार्च 2025 मध्ये व्यावसायिक उड्डाणांसाठी सुरू होईल.
देशातील दुसरा सर्वात मोठा विमानतळमहिनाभरापूर्वी वायुदलाच्या C-295 आणि सुखोई-30 या विमानांचे यशस्वी लँडिंग येथे झाले होते. यानंतर, पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचे लँडिंग यशस्वीपणे पार पडले आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर, नवी मुंबईतील हे विमानतळ देशातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ ठरेल. हे विमानतळ सुमारे 5,945 एकर जागेवर उभारले गेले आहे आणि मुंबईपासून 40 किमी अंतरावर पनवेलजवळ स्थित आहे.