Plots on lease: मुंबईच्या शेजारी असलेल्या नवी मुंबईत तुम्ही बंगला, हॉटेल, व्यावसायिक वापरासाठी जागा शोधत आहात? मग ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण, सिडकोकडून नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी भूखंड उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. नवी मुंबईतील विविध नोडमधील एकूण 76 भूखंड हे भाडे पट्ट्यावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
सिडकोकडून नवी मुंबईत उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या भूखंडाचा निवासी, वाणिज्यिक, निवासी तथा वाणिज्यिक, बंगला, सेवा उद्योग आणि रो हाऊस वापरासाठी करता येणार आहे. जाणून घ्या नेमक्या कोणत्या ठिकाणी हे भूखंड आहेत आणि त्यासाठी अर्ज कसा करावा....
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईच्या ऐरोली, घणसोली, सानपाडा, नेरूळ, खारघर, कळंबोली, पनवेल (पू.) आणि द्रोणागिरी नोडणधील 76 भूखंड भाडेपट्ट्यावर उपलब्ध करुन देण्याकरिता ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेद्वारे पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या योजनेची सविस्तर माहिती तसेच योजना पुस्तिका या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
हे पण वाचा :
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
- योजना क्र. 42 अंतर्गत निवासी, वाणिज्यिक, निवासी तथा वाणिज्यिक, बंगला, सेवा उद्योग आणि रो हाऊस वापराकरिता भूखंड उपलब्ध
- नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, सानपाडा, नेरूळ, खारघर, कळंबोली, पनवेल (पू.) आणि द्रोणागिरी नोडमधील मोक्याच्या ठिकाणी भूखंड उपलब्ध.
- भूखंडाचे कमाल क्षेत्रफळ 12087.51 चौ. मी. आणि किमान क्षेत्रफळ 41.6 चौ. मी.
- सर्व पायाभूत सुविधांसह उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले भूखंड आहेत.
- योजनेच्या संबधित सर्व प्रक्रिया ऑनलाईन आणि परदर्शी ई-लिलाव तथा ई-निविदा प्रक्रियेद्वारे होणार आहे
हे पण वाचा :
ई - लिलाव तथा ई-निविदा प्रक्रियेचे वेळापत्रक
- बंद निविदेकरिता दस्तऐवज शुल्क भरण्याची प्रक्रिया 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 21 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत.
- बंद निविदेकरिता अनामत रक्कम भरणा 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 21 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत.
- बंद निविदा सादर करण्याचा कालावधी 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 21 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत.
- ई-लिलावाकरिता दस्तऐवज शुल्क भरणा 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 22 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत.
- ई-लिलावाकरिता अनामत रकमेचा भरणा 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 22 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत.
- ऑनलाईन ई-लिलाव 22 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 22 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.
- निकाल 23 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता घोषित करण्यात येईल.