बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासाचा वेग वाढला आहे. या प्रकरणात आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत पोलिसांकडून १५० जणांची चौकशी करण्यात येत आहे. पोलीस फरार आरोपींच्या मागावर आहेत. याच प्रकरणी सीआयडीने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांकडून आरोपी आणि नातेवाईकांचे सर्व खाते गोठवण्यात आले आहेत. त्यामुळे आरोपींच्या गळ्यावरील फास आणखी आवळल्याची चर्चा आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात सीआयडीच्या हाती पुरावे लागणे सुरु झाले आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा आरोप असलेल्या वाल्मिकी कराडचाही सोध सुरु आहे. त्याला आतापर्यंत अटक होऊ न शकल्यामुळे बीडमध्ये संतापाची लाट पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी वाल्मिकी कराडसह ४ जणांची बँक खाते गोठवले आहेत. या प्रकरणाचा सीआयडीच्या ९ पथकाकडून शोध सुरु आहे.
या प्रकरणात आता आरोपी आणि नातेवाईकांचेही सर्व बँक खाते गोठवण्यात आले आहेत. मालमत्ता जप्त करण्याचे अजूनही काही कारवाई करण्यात आलेली नाही. कोर्टात ऑर्डर आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. तीन आकडीपेक्षा अधिक खाते आरोपींच्या संबंधित लोकांचे असल्याची माहिती हाती आली आहे. त्या संबंधित लोकांचे खाते गोठवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आज दिवसभरात २५ जणांची चौकशी करण्यात येणार आहे. मोबाईल रिकव्हर डेटा फॉरेंसिक रिपोर्ट 5 दिवसात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आरोपी आणि त्यांच्याशी संबंधित खात्याच्या आकडा तीन आकड्यात असल्याची माहिती मिळत आहे. पॅन-आधारशी जोडलेल्या लिंक बँक खात्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात जी माहिती मिळतेय, ती कोर्टाला सांगितली जाणार आहे. कोर्टाच्या आदेशावरून संपत्ती जप्त करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.